---Advertisement---

एकाच दिवशी तब्बल पाच आंतरराष्ट्रीय सामन्यात वाहिली गेली वॉर्नला श्रद्धांजली; रोहित-विराट म्हणाले…

---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन महान फिरकीपटू शेन वॉर्न याने शुक्रवारी (४ मार्च) अखेरचा श्वास घेतला. हार्ट अटॅकमुळे थायलंड येथे त्याचे आकस्मित निधन झाले. तो ५२ वर्षांचा होता. आपल्या फिरकीच्या तालावर जगभरातील फलंदाजांना नाचवणाऱ्या वॉर्नला क्रिकेटविश्वातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. तसेच, ऑस्ट्रेलियाचे आणखी एक दिग्गज रॉडनी मार्श यांनादेखील श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. क्रिकेटविश्वात तब्बल पाच सामन्यांमध्ये या दोन्ही दिग्गजांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

सर्व सामन्यांमध्ये वाहली गेली श्रद्धांजली

https://twitter.com/BCCI/status/1499958645039063041?t=nVOMYkZBf2D7urCazp61KQ&s=19

https://twitter.com/TheRealPCB/status/1499978254668775425?t=VXAEDtt0acl8LhQkgX31Hg&s=19

शेन वॉर्न व मार्श यांच्या निधनामुळे क्रिकेटजगतातून‌ हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान मोहाली येथे कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी दंडा व काळी पट्टी बांधून तसेच दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याचप्रमाणे इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी देखील त्याला अशाच प्रकारे श्रद्धांजली वाहिली गेली. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी देखील दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मैदानावर त्यांना आदरांजली वाहिली.

https://www.instagram.com/reel/CastEtiB-r2/?utm_medium=copy_link

याव्यतिरिक्त महिला विश्वचषकात ५ मार्च रोजी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तसेच बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यात देखील दंडावर काळी पट्टी बांधून वॉर्न व मार्श यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात आला.

रोहित विराटने दिली प्रतिक्रिया

मोहाली कसोटीचा दुसरा दिवस सुरू होण्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा व अनुभवी फलंदाज विराट कोहली यांनी शेन वॉर्नला शाब्दिक श्रद्धांजली अर्पण केली. रोहित म्हणाला,

“वॉर्नच्या निधनाची बातमी दुःखात लोटणारी होती. ही क्रिकेट जगताची मोठी हानी आहे. या कठीण काळात आपण सर्व त्याच्या कुटुंबासोबत आहोत.”

https://twitter.com/BCCI/status/1499957284717268993?t=Lw2vzW6liD-XY59Su6vpbQ&s=19

तर विराट कोहली म्हणाला,

https://twitter.com/BCCI/status/1499960950778040321?t=ovp59Q-QNvB6eRuDxxCJ-A&s=19

“आयुष्य खूप अनपेक्षित आहे. मी या ठिकाणी खूप दुःखात आणि चकित होऊन उभा आहे. त्याला माझ्याकडून श्रद्धांजली” या व्यतिरिक्त भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी देखील शेन वॉर्न व रॉडनी मार्श यांना श्रद्धांजली वाहिली.

महत्वाच्या बातम्या-

मोहाली कसोटी : रविंद्र जडेजाचे शानदार शतक, रचले विक्रमांचे मनोरे; हटके सेलिब्रेशन चर्चेत (mahasports.in)

PAK vs AUS: पहिल्या कसोटीच्या खेळपट्टीचा फोटो पाहून युझर्सनी केली थेट रस्त्याशी तुलना, पाहा मीम्स (mahasports.in)

विराटच्या १०० व्या कसोटीनिमित्त अनुष्काने मैदानात उतरणे योग्य की अयोग्य? चाहत्यांमध्ये रंगले ट्वीटरवॉर (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---