• About Us
मंगळवार, मे 30, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत सूर्याची बादशाहत कायम! वर्ल्डकपमध्ये धावांचा रतीब घालूनसुद्धा विराट ‘या’ स्थानावर

टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत सूर्याची बादशाहत कायम! वर्ल्डकपमध्ये धावांचा रतीब घालूनसुद्धा विराट 'या' स्थानावर

वेब टीम by वेब टीम
नोव्हेंबर 16, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
0
virat kohli suryakumar yadav

Photo Courtesy: bbci.tv


ऑस्ट्रेलियामध्ये नुकतेच पुरूष संघाच्या टी20 विश्वचषक (T20 World Cup)स्पर्धचा समारोप झाला. या स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी20 क्रमवारी जाहीर केली. त्यामध्ये अनेकांच्या गुणांमध्ये फरक दिसला, ज्याचा परिणाम क्रमवारीवर झाला. फलंदाजांच्या क्रमवारीत सूर्यकुमार यादव पहिल्या स्थानावर कायम आहे, कारण त्याच्या आपपासचे फलंदाजी अधिक धावा करण्यात अपयशी ठरले. धावांचा डोंगर रचणाऱ्या विराटला मात्र धक्का बसला आहे.

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) इंग्लंड विरुद्ध लवकर बाद झाल्याने त्याचे गुण 869 वरून 859 वर आले. त्याने आठव्या टी20 विश्वचषकाच्या सुपर 12च्या 5 डावांमध्ये तीन अर्धशतकी खेळी केल्या. यामध्ये त्याने 189.68च्या स्ट्राईक रेटने 239 धावा केल्या.

टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करूनसुद्धा विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या दहा क्रमांकाच्या बाहेरच राहिला. त्याने आता 11वे स्थान गाठले आहे. विराटने 6 सामन्यात 4 अर्धशतकांच्या मदतीने आणि 98.67च्या सरासरीने 296 धावा केल्या.

इंग्लंडचा सलामीवीर ऍलेक्स हेल्स (Alex Hales) याने उपांत्य फेरीत भारताविरुद्ध 47 चेंडूत नाबाद 86 धावा केल्या आणि त्याला 22 स्थानांचा फायदा झाला. तो आता 12व्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम एक पायरी चढत तिसऱ्या स्थानावर आला आहे. तसेच मोहम्मद रिझवान याने दुसरे स्थान कायम राखले आहे.

गोलंदाजीत इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशिद याला पाच स्थानांचा फायदा झाला असून तो तिसऱ्या स्थानावर आला आहे. अंतिम सामन्याचा सामनावीर आणि मालिकावीर सॅम करन यानेही दोन क्रमांकांनी उडी घेतली. तो आता 5व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध 4 षटकात 12 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या.

पहिल्या स्थानावर श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा आणि दुसऱ्या स्थानावर अफगाणिस्तानचा राशिद खान आहे. तसेच अष्टपैलूंच्या क्रमवारीत बांगलादेशचा शाकिब अल हसन पहिल्या स्थानावर, अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी दुसऱ्या आणि भारताचा हार्दिक पंड्या तिसऱ्या स्थानावर आहे. ICC T20 Ranking suryakumar yadav retains top ten in batting & virat kohli in this spot

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सिक्स पॅक्स असावेत तर भारतीयांसारखे! समुद्रकिनारी दिसली हार्दिक पंड्या आणि कंपनी
रोहित-राहुलच्या अनुपस्थितीत कोण करणार ओपनिंग? पर्यायांनी वाढली कॅप्टन हार्दिकची डोकेदुखी


Previous Post

सिक्स पॅक्स असावेत तर भारतीयांसारखे! समुद्रकिनारी दिसली हार्दिक पंड्या आणि कंपनी

Next Post

बाबर आझमचा अपमान करणे पडले महागात, पाकिस्तानी ‘या’ खेळाडूला मिळाली कायदेशीर नोटीस

Next Post
Babar azam

बाबर आझमचा अपमान करणे पडले महागात, पाकिस्तानी 'या' खेळाडूला मिळाली कायदेशीर नोटीस

टाॅप बातम्या

  • नवा हंगाम नवा विजेता! IPL 2023ला मिळाला ‘Purple Cap’ विनर, टॉप 5 खेळाडूंमध्ये गुजरातचे 3 धुरंधर
  • अनुभवावर नव्या दमाची प्रतिभा भारी! शुबमनने पटकावली IPL 2023ची ऑरेंज कॅप; यादीत CSKचा एकच धुरंधर
  • ब्रेकिंग! CSK ने पाचव्यांदा जिंकली IPL ची ट्राॅफी, थरारक फायनलमध्ये गुजरातचा निसटता पराभव
  • सुदैवाने पावसानंतरही फायनल मॅच खेळली जाणार, सीएसकेला विजयासाठी ‘इतक्या’ धावांचे आव्हान
  • IPL प्ले-ऑफ्सचा राजा गुजरात टायटन्स! फायनलमध्ये चेन्नईला चोपत नावावर केला खास विक्रम
  • आयपीएल फायनलमध्ये सर्वात महागात पडलेले ‘हे’ गोलंदाज, तुषार देशपांडे यादीत नव्याने सामील
  • IPL ब्रेकिंग! अहमदाबादेत पुन्हा धो-धो, अंतिम सामना थांबवला, पाऊस न थांबल्यास काय होणार?
  • फायनलमध्ये साईने दिले ‘सुदर्शन’! चेन्नईची गोलंदाजी फोडत ठोकल्या वादळी 96 धावा
  • डब्ल्यूटीसी फायनलआधी ऑस्ट्रेलियासाठी गुड-न्यूज, वेगवान गोलंदाजाचे संघात पुनरागमन
  • ‘अरे तू कॅच नाही, IPL ट्रॉफी ड्रॉप केली’, गिलचा झेल सोडल्यानंतर चाहर जोरदार ट्रोल
  • ‘शोमॅन’ गिलने केले ऋतुच्या विक्रमावर ‘राज’! 16 वर्षांच्या आयपीएल इतिहासात ठरला नंबर वन
  • वय झालं तरी चित्त्याची चपळाई कमी होत नसते! गिलला यष्टीचित करणाऱ्या धोनीवर कौतुकाचा वर्षाव, बघा तो Video
  • हंगामात तब्बल ‘इतक्या’ धावा कुटत शुबमन गिल ठरला ‘घाटाचा राजा’! विराटचा ‘तो’ विक्रम मात्र अबाधित
  • जेव्हाही IPL इतिहासाची पाने पाहिली जातील, तेव्हा ‘या’ विक्रमात धोनीच दिसेल ‘टॉपर’, पाहा रेकॉर्ड
  • फायनलपूर्वी आली मोठी बातमी! CSKच्या खेळाडूंना पैशांचं आमिष दाखवतो ‘हा’ खेळाडू, स्वत:च केला खुलासा
  • IPL Final 2023 : पहिला निकाल धोनीच्या बाजूने, टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
  • विराटबाबत बोलताना इरफानचा गंभीरवर निशाणा, अष्टपैलूचे वक्तव्य बनले चर्चेचा विषय
  • भारतीय संघाच्या ‘या’ खेळाडूसाठी पुढील 6 ते 8 महिने खूपच महत्त्वाचे, दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य
  • ‘पाय पकडू नको भावा…’, IPL संपल्यानंतर अलीगडला पोहोचताच रिंकूने पुन्हा जिंकली चाहत्यांची मने, Video
  • WTC फायनलसाठी पंचांची घोषणा! टीम इंडियासाठी ‘अनलकी’ ठरलेले पंचही सामील
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In