टी20 विश्वचषकात इंग्लंडने धमाकेदार प्रदर्शन करत विश्वचषकवर आपले नाव कोरले. टी20 विश्वविजेत्या संघात केवळ खेळाडूंचे योगदान नसून त्यात त्यांचे मुख्य प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांचा देखील मोठा वाटा आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू मॅथ्यू मॉट यांनी अंतिम सामना जिंकल्यावर एक मजेशीर गोष्ट केली आहे. इंग्लंड विश्वविजेता बनताच प्रशिक्षक मॉट यांनी टक्कल केले. मॉटचे टक्कल करणे धोनीची आठवण करुन देणारा क्षण ठरला, ज्यानेे 2011चा विश्वचषक जिंकल्यानंतर टक्कल केले होते.
2011च्या विश्वचषकाच्या आधी महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याने हा विश्वचषक जिंकण्यासाठी एक देवीला साकडे घातले होते आणि त्याची ईच्छा पूर्ण होताच त्याने टक्कल केले. मात्र, मॉट यांनी कोणत्याही साकड्यामुळे नाही तर एका पैजेमुळे टक्कल केले आहे. सॅम करन (Sam Curran) आणि प्रशिक्षक मॅथ्यू मॉट (Matthew Mott) यांच्यात पैज लागेलली की जर इंग्लंडने विश्वचषक जिंकला तर मॉट यांना टक्कल करावे लागणार होते आणि शेवटी तसेच झाले. इंग्लंडने विश्वचषक जिंकला आणि मॉट यांना ठरल्याप्रमाणे आपल्या केसांचा त्याग करावा लागला. काही प्रसार माध्यमांच्या माहितीनुसार, मेलबर्नमध्ये सामना जिंकल्यानंतर ड्रेसिंग रूममध्येच मॉट यांचे मुंंडन करण्यात आले.
मॅथ्यू मॉट यांचे कोचिंग विश्वात मोठे नाव
मॅथ्यू मॉट यांचा क्रिकेट कोचिंग विश्वात वेगळाच रुबाब आहे. या प्रशिक्षकाने एक-दोनदा नाही तर तब्बल 4 वेळा विश्वचषक जिंकण्याचा कारनामा करुन दाखवला आहे. मॉट या आधी ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाचे प्रशिक्षक होते. 2018 मॉट यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियन महिला संघाने टी20 विश्वचषक जिंकलेला. त्यानंतर 2020मध्ये देखील ऑस्ट्रेलियन संघ विश्वविजेता बनला. 2022मध्ये ऑस्ट्रेलियन महिला संघाने एकदिवसीय विश्वचषक आपल्या नावे केल आणि ते इंग्लंडच्या संघाला विश्वविजेता बनवण्यात यशस्वी झाले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023 आधी मुंबईने या खेळाडूंना दिला नारळ; रोहितच्या नेतृत्वात हे 15 शिलेदार कायम
आयपीएलच्या दिग्गजांना ‘बाय-बाय’ करत सीएसकेने राखले आपले 18 ‘सुपर किंग्स’