आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलावाचे (mega auction) आयोजन केले होते. यावर्षी लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन फ्रेंचायझी स्पर्धेत सहभागी होणार असल्यामुळे मेगा लिलाव अधिकच रंजक बनला होता. यावर्षी आता आठ ऐवजी १० संघ मैदानात खेळताना दिसणार आहेत. प्रत्येक फ्रेंचायझीने आगामी हंगामाच्या दृष्टीने त्यांचा संघ तयार केला आहे. चला तर जाणून घेऊया सर्व संघांच्या संभाव्य सलामीवीर जोड्यांविषयी.
लखनऊ सुपर जायंट्स –
आयपीएलमध्ये नव्याने सहभागी झालेली फ्रेंचायझी लखनऊ सुपर जायंट्स मेगा लिलावापूर्वी कर्णधाराच्या रूपात केएल राहुलला रिटेन केले होते, तर क्विंटन डी कॅकला संघाने मेगा लिलावात विकत घेतले. हे दोन्ही दिग्गज आगामी आयपीएल हंगामात लखनऊ सुपर जायंट्सच्या डावाची सुरुवात करताना दिसतील.
दिल्ली कॅपिटल्स –
दिल्ली कॅपिटल्स संघाला यावर्षी नवीन सलामीवीर जोडी लाभणार आहे. शिखर धवन संघातून बाहेर पडल्यानंतर संघाने डेविड वॉर्नरला संघात सामील केले आहे. वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर आहे आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी तो पृथ्वी शॉ सोबत सलामीला आलेला दिसेल.
मुंबई इंडियन्स –
आयपीएलची सर्वात यशस्वी फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सच्या सालामीवीर जोडीत यावर्षी शक्यतो काहीच बदल दिसणार नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन डावाची सुरुवात करताना दिसतील. ईशान किशनसाठी मुंबई इंडियन्से मेगा लिलावात तब्बल १५.२५ कोटी रुपये खर्च केले.
चेन्नई सुपर किंग्ज –
चेन्नई सुपर किंग्जसाठी आगामी हंगामात युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉन्वे सलामीवीराच्या भूमिकेत दिसतील. संघाने ऋतुराजला आधीच रिटेन केले होते, तर कॉन्वेला मेगा लिलावात खरेदी केले आहे.
सनरायझर्स हैदराबाद –
सनरायझर्स हैदराबादच्या डावाची सुरुवात करण्यासाठी यावर्षी नवीन सलामीवीर जोडी लाभली आहे. डेविड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो आता संघातून बाहेर पडले आहेत. सनरायझर्स हैदराबादचे गोलंदाजी प्रशिक्षक मुथैय्या मुरलीधरन यांनी सलामीवीरांविषयी बोलताना केन विलियम्सन आणि अभिषेक शर्मा या दोघांची नावे घेतली होती. अशात हे दोन फलंदाज सनरायझर्सच्या डावाची सुरुवात करताना दिसू शकतात.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर –
युवा देवदत्त पडिक्कल आगामी हंगामापूर्वी दुसऱ्या संघात सहभागी झाला आहे. अशात विराट कोहली आणि दक्षिण अफ्रिकेचा दिग्गज फाफ डू प्लेसिस रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी सलामीवीराची भूमिका पार पाडतील.
कोलकाता नाइट रायडर्स –
शुभमन गिल यावर्षी कोलकाता नाइट रायडर्सचा भाग नाहीय. केकेआर मागच्या हंगामात अंतिम सामन्यात पराभूत होऊन उपविजेता संघ बनला होता. आगामी हंगांमात या संघाच्या सलामीवीराच्या रुपात वेंकटेश अय्यरसोबत एलेक्स हेल्स किंवा अजिंक्य रहाणे दिसू शकतो.
राजस्थान रॉयल्स –
राजस्थान रॉयल्सने मेगा लिलावात एक भक्कम संघ तयार केला आहे आणि सलामीसाठी त्यांच्याकडे अनेक पर्याय आहेत. असे असले तरी, युवा यशस्वी जयस्वाल आणि देवदत्त पडिक्कल सलामीवीराची भूमिका स्वीकारण्यासाठी भक्कम दावेदार आहेत.
पंजाब किंग्ज –
मागच्या हंगामापर्यंत केएल राहुल पंजाबचा कर्णधार आणि सलामीवर फलंदाज होता, परंतु आता तो संघासोबत नाहीय. अशात मयंक अगरवाल आणि शिखर धवन पंजाब किंग्जच्या डावाची सुरूवात करताना दिसू शकतात.
गुजरात टायटन्स –
शुभमन गिल या आयपीएल हंगामात गुजरात टायटन्स संघाचा भाग बनला आहे. अशात गिल डावाची सुरुवात करताना दिसू शकतो. इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जेसन रॉय गिलसोबत सलामीसाठी खेळपट्टीवर येईल.
महत्वाच्या बातम्या –
पहिली टी२० जिंकत भारताचे विंडीजविरुद्ध खास ‘शतक’, आतापर्यंत फक्त दोनच संघांना जमलाय हा पराक्रम
व्वा काय झेल आहे! रोहितने कसला भारी कॅच घेतला, बाजूला उभा असलेला सूर्यकुमारही बघतच राहिला
विराट, राहुल टॉप-१० मध्ये कायम, तर गोलंदाजांमध्ये भुवनेश्वरने राखली लाज; पाहा ताजी टी२० क्रमवारी