माजी भारतीय क्रिकेटपटू आणि मिस्टर आयपीएल सुरेश रैना याने मंगळवारी (06 सप्टेंबर) क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्ती जाहीर केली आहे. परदेशी टी20 लीगमध्ये सहभागी होण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला असल्याचे समजत आहे. अर्थातच आता रैना पुन्हा कधीही आयपीएल खेळताना दिसणार नाही. ऑक्टोबर 2021 मधील राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना त्याचा शेवटचा आयपीएल सामना ठरला आहे. जरी रैनाने आता आयपीएलला अलविदा केला असला, तरीही त्याचा आयपीएलचा प्रवास फार पूर्वीच संपला होता.
आयपीएल 2022 (IPL 2022) चा मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी 2022 ला झाला होता. या मेगा लिलावात अनेक मोठ्या दिग्गजांवर बोली लागताना दिसली, पण काही खेळाडू असे राहिले ज्यांच्यावर कोणत्याही फ्रेंचायझीने बोली लावली नव्हती. चेन्नई सुपर किंग्जचा महत्वाचा फलंदाज सुरेश रैना (suresh raina) याच्यावरही मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी कोणत्याच फ्रेंचायझीने बोली लावली नव्हती आणि तो अनसोल्ड खेळाडूंच्या यादीत सामील झाला होता.
मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी एक्सलरेटेड लिलाव होता. कमीत कमी या दिवशी फ्रँचायझी अनसोल्ड खेळाडूंना त्यांच्या बेस प्राइसवर विकत घेऊ शकत होत्या. परंतु या दिवशीही रैना दुर्लक्षित राहिला होता.
त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या आयपीएल 2022 मधील पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या अंबाती रायुडूला दुखापत झाली होती. अशात त्याच्याजागी रैनाला संघात घेतला जाईल, असे म्हटले जात होते. परंतु चेन्नईने रैनावर विश्वास दाखवला नव्हता. इथेच रैनाचा आयपीएल प्रवास थांबला असल्याचे संकेत मिळाले होते.
दरम्यान ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना याने मंगळवारी (06 सप्टेंबर) क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्ती जाहीर केली आहे. रैना 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती झाला होता. आता इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि देशांतर्गत क्रिकेटमधूनही तो निवृत्त (Suresh Raina To Retire From IPL) झाला आहे. त्याने स्वत: सोशल मीडियाद्वारे याबद्दल माहिती दिली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘ब्लू जर्सी’त पुन्हा एकदा धमाका करणार सुरेश रैना, तेंडूलकरच्या कॅप्टन्सीखाली करणार पदार्पण!
चेन्नईच्या लाडक्या ‘चिन्नाथाला’च्या 5 करामती, ज्यामुळे जगाने मान्य केला ‘मिस्टर आयपीएल’
Breaking: सुरेश रैनाची आयपीएलमधून निवृत्ती, संपवले बीसीसीआयसोबतचे सर्व संबंध