साउथँम्पटन। आज(22 जून) आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात 28 वा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात होत आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 224 धावा करत अफगाणिस्तान समोर विजयासाठी 225 धावांचे आव्हान ठेवले आहे.
या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी 28 धावांवर असताना राशिद खानच्या गोलंदाजीवर यष्टीचीत झाला आहे. त्यामुळे वनडे कारकिर्दीत यष्टीचीत होण्याची ही धोनीची केवळ दुसरी वेळ आहे.
याआधी तो 8 वर्षांपूर्वी 20 मार्च 2011 ला विंडीज विरुद्ध यष्टीचीत झाला होता. त्यावेळी त्याला डेवोन थॉमस या विंडीजच्या यष्टीरक्षकाने देवेंद्र बिशूच्या गोलंदाजीवर 22 धावांवर बाद केले होते. विशेष म्हणजे हा देखील विश्वचषकातीलच सामना होता.
या सामन्यात भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 67 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे. तर केदार जाधवने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली.
तसेच विराट आणि केएल राहुलने दुसऱ्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. त्याचबरोबर विराटने राहुल 30 धावांवर बाद झाल्यानंतर विजय शंकरच्या(29) साथीने तिसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी रचली. तर धोनी आणि केदारमध्येही 57 धावांची पाचव्या विकेटसाठी भागीदारी झाली. त्यामुळे भारताला 50 षटकात 200 धावांचा टप्पा पार करता आला.
अफगाणिस्तानकडून गुलाबदीन नाईबने आणि मोहम्मद नाबीने प्रत्येकी 2 विकेट घेतली; तर राशिद खान, रेहमत शहा, मुजीब उर रेहमान आणि अफताब आलमने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
WATCH NOW: The stumping king gets stumped! 👀
DOWNLOAD THE #CWC19 APP TO SEE THE DISMISSAL VIDEO ⬇️
APPLE 👉 https://t.co/whJQyCahHr
ANDROID 👉 https://t.co/Lsp1fBwBKR pic.twitter.com/zsPX3EeeD0— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 22, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–इंग्लंडमध्ये सचिन-द्रविड नंतर विराट कोहलीनेही केला तो खास विक्रम
–रोहितची विकेट नडली! भारताविरुद्ध झाला तो विक्रम
–विश्वचषक २०१९: लसिथ मलिंगाने रचला इतिहास, केला नवीन विश्वविक्रम