---Advertisement---

ऋतुराजच्या जागी स्थान मिळालेल्या पवनने साधली संधी! ठोकले पदार्पणात नाबाद दिडशतक

On: गुरूवार, फेब्रुवारी 17, 2022 9:45 PM
---Advertisement---

देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाची स्पर्धा रणजी ट्रॉफीचा २०२२ (ranji trophy 2022) हंगाम गुरुवारी (१७ फेब्रुवारी) सुरु झाला. यावर्षीच्या हंगामाच्या पहिल्यात दिवशी अनेक खेळाडूंनी जबरदस्त प्रदर्शन केले. पहिल्या दिवशी अजिंक्य रहाणे आणि मनीष पांडे यांसारख्या अनुभवी फलंदाजांनी शतक ठोकले. तर १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार यश धूलनेही शतकी खेळी केली. या फलंदाजांव्यतिरिक्त अजून एक युवा फलंदाज होता, ज्याने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात शतकाने सुरुवात केली. २२ वर्षीय या खेळाडूचे नाव आहे पवन शाह (pawan shah). जो महाराष्ट्र संघाचा भाग आहे.

महाराष्ट्र आणि आसाम संघ रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पहिला सामना एकमेकांविरोधात खेळत आहेत. सामन्याच्या पहिल्या दिवशी पवन शाह महाराष्ट्र संघाच्या सलामीसाठी आला. शाहसाठी हा त्याचा प्रथमश्रेणी क्रिकेटमधील पदार्पण सामना आहे आणि याची सुरुवात त्याने जबरदस्त केली. महाराष्ट्र संघाला जेव्हा गरज होती, तेव्हा शाहने ही महत्वपूर्ण खेळी केली आहे.

शाहने सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण २७५ चेंडू खेळले आणि यामध्ये १६५ धावा केल्या. यामध्ये १५ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत महाराष्ट्राने ५ विकेट्सच्या नुकसानावर २७८ धावा केल्या आहेत. पवन शाह आणि दिव्यांग हिंगनेकर (३६) हे दोन खेळाडू सध्या खेळपट्टीवर कायम आहेत. महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड सध्या कोलकातामध्ये भारतीय संघासोबत आहे. ऋतुराजच्या अनुपस्थितीत शाहला संधी दिली गेली आहे.

पवन शाहने पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी केली. परंतु १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार यश धूल त्याच्यापेक्षा अधिक चर्चेत राहिला. यशने नुकत्याच पार पडलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत संघाला विजेतेपद मिळवून दिले. यशने पहिल्या सामन्यातून दिल्लीसाठी प्रथमश्रेणी पदार्पण केले आणि या सामन्यात ११३ धावांची महत्वाची खेळी केली. या प्रदर्शनसाठी त्याचे कौतुक केले जात आहे. अजिंक्य रहाणेने मुंबईसाठी पहिल्या दिवशी शतक ठोकले आणि भारतीय संघात संधी मिळण्यासाठी दावेदारी सिद्ध केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

NZvSA TEST: न्यूझीलंडने केली दक्षिण आफ्रिकेची वाताहात! हेन्रीच्या गोलंदाजीने यजमान फ्रंटफूटवर

“आयपीएल जवळ आल्यावर खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमी प्रयत्न करतात”

कौतुक तर व्हायलाच पाहिजे! पहिली आंतरराष्ट्रीय विकेट घेताच विराट-रोहितने थोपटली बिश्नोईची पाठ, व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---