भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना धमाकेदार प्रदर्शन केले आणि प्रत्युत्तरात गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली. भारतीय संघाने या सामन्यात मोठी धावसंख्या केली, पण त्यांच्या एक दोन नाही तर तीन फलंदाजांना शतकाला मुकावे लागले. विश्वचषक हंगामाचा विचार केला, तर भारताने आतापर्यंत तब्बल 8 शतकांच्या संधी गमावल्या आहेत.
भारत आणि श्रीलंका संघ वनडे विश्वचषकात गुरुवारी (2 नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आमने सामने आले. भारताने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्सच्या 357 धावा केल्या. यात विराट कोहली 92, विराट कोहली याने 88, तर श्रेयस अय्यर 82 धावा करून बाद झाले. या तिन्ही फलंदाजांकडे शतकाची संधी होती. मात्र, चुकीचा शॉट खेळून त्यांनी विकेट्स गमावल्या.
विश्वचषक 2023 मध्ये आतापर्यंत 8 वेळा असे पाहायला मिळाले आहे की, भारतीय फलंदाज शतकाच्या अगदी जवळ असताना बाद आहेत. विराटने चालू विश्वचषकात तीन वेळा अशी संधी गमावली आहे. गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध 88 धावांवर बाद होण्याआधी त्याने 95 आणि 85 धावांवर विकेट्स गमावल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा यानेही चालू विश्वचषकात दोन वेळा असी चूक केली आहे. रोहितने 86 आणि 87 धावांवर आपल्या विकेट्स गमावल्या आहेत. केएल राहुल देखील विश्वचषकादरम्यान 97 धावांवर नाबाद परतला होता. शुबमन गिल (92) आणि श्रेयस अय्यर (82) यांच्यासोबतही प्रत्येक एक-एक वेळा असे झाले आहे. (In the 2023 ODI World Cup, Indian batsmen gave up the chance of a century as many as 8 times)
वनडे विश्वचषक 2023 मध्ये शतक थोडक्यात हुकलेले भारतीय (80 पेक्षा अधिक धावा)
विराट कोहली – 85, 95, 88
रोहित शर्मा – 86, 87
केएल राहुल – 97*
शुबमन गिल – 92
श्रेयस अय्यर – 82
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
श्रीलंका – पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक/कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महीश थीक्षणा, कसून रजिथा, दुष्मंथ चमीरा, दिलशान मदुशंका.
महत्वाच्या बातम्या –
CWC 2023: जस्सी जैसा कोई नही! पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेला दिला दणका
विश्वचषक 2023 मधील खास विक्रम मधुशंकाच्या नावावर, शाहीन आफ्रिदीसह ‘या’ दिग्गजाला पझाडले