कोलकता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस बंदिस्त क्रीडा संकुलात पार पडलेल्या ” ४५ व्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी” स्पर्धेत मुलांमध्ये चंदीगड, तर मुलींत साई यांनी अंतिम विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राच्या मुलांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
कोलकता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस बंदिस्त क्रीडा संकुलात झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात चंदीगडने उत्तर प्रदेशचे आव्हान ४१-३२ असे संपवित या गटाचे जेतेपद पटकाविले. मुलींच्या गटात अत्यंत चुरशीनें खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात साईनें हरियाणावर ३३-२९अशी मात करीत या गटाचे विजेतेपद आपल्याकडे राखले.
या अगोदर झालेल्या मुलांच्या उपांत्य सामन्यात चंदीगडने महाराष्ट्राला ४८-३४ असे,तर उत्तर प्रदेशने तामिळनाडूला २७-१९ असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. मुलींमध्ये साईने उत्तर प्रदेशवर ३९-२१ असा, तर हरियाणाने छत्तीसगडवर ३३-१९ असा विजय मिळवीत अंतिम फेरी गाठली होती.
अंतिम निकाल कुमार गट:
विजेतेपद- चंदीगड
उपविजेतेपद- उत्तरप्रदेश
तिसरा क्रमांक- महाराष्ट्र व तामिळनाडू
अंतिम निकाल कुमारी गट:
विजेतेपद- साई
उपविजेतेपद- हरियाणा
तिसरा क्रमांक- उत्तरप्रदेश व छत्तीसगड
महत्त्वाच्या बातम्या:
–दादरच्या शिंदेवाडीत आजपासून रंगणार “स्व. मोहन नाईक चषक” राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
–महाराष्ट्राची मुले उपांत्य फेरीत, मुलींचे आव्हान संपुष्टात. असे होणार उपांत्य फेरीचे सामने