आगामी आयपीएल हंगामात खाही दिग्गज खेळाडू खेळू शकणार नाहीत. यापैकीच एक नाव म्हणजे दिल्ली कॅफिटल्सचा कर्णधार आणि भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचे. पंतला डिसेंबर 2022 मध्ये अपघातात गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे तो आगामी आयपीएल खेळू शकणार नाहीये. याच पार्श्वभूमीवर आता संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी खास प्रतिक्रिया दिली.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या इतिहासातील दिग्गज कर्णधार आणि माजी दिग्गज रिकी पाँटिंग (Ricky Ponting) दिल्ली कॅफिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका 2018 हंगामापासून पार पाडत आला आहे. आयपीएल 2023 मध्येही पाँटिंग ही भूमिका नाभावून नेणार आहे. पण यावेळी त्याला दिल्ली संघाचा कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) याची साथ मिळणार नाहीये. याच पार्श्वभूमीवर पाँटिंग आणि संघ व्यवस्थापन मिळून एक महत्वाचा निर्णय घेऊ शकतात. पाँटिंग म्हटल्याप्रमाणे संघाला डगआउटमध्ये पंतची कमी जाणवेल.
पंतच्या अनुपस्थितीत आगामी आयपीएलमध्ये डेविड वॉर्नर दिल्लीच्या कर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. दुखापतग्रस्त पंतविषयी पाँटिंग म्हणाला, “मला वाटते तो डगआउटमध्ये माझ्यासोबत असायला पाहिजे. पण हे शक्य नाहीये. अशात आम्ही दुसरे काहीतरी करू शकतो. आम्ही आमचा शर्ट आणि टोपीवर त्याचा जर्सीनंबर लिहू शकतो. यातून मी हे दर्शवू इच्छितो की, तो संघासोबत नसला, तरी आमचा लिडर आहे.”
दरम्या, डिसेंबर 2022 मध्ये पंत दिल्लीहून त्याच्या घरी रुरुकीला म्हणजेच त्याच्या घरी चालला होता. यावेळी गाडीत पंत एकटा असून जाताना पहाटेच्या सुमारास त्याचा अपघात झाला. अपघातात पंतची गाडी जळून खाक झाली, पण सुदैवाने गाडी पेटण्याआधीच तो बाहेर पडला होता. अपघात गंभीर असल्याने पंतला झालेली दुखापत देखील तितकीच मोठी होती. त्याच्यावर दरम्यानच्या काळात काही शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत. पण मैदानात पुनरागमन करण्यासाठी पंतला अजून मोठा काळ लागणार आहे. आगामी आयपीएलमध्ये वॉर्नर दिल्लीचा कर्णधार, तर अक्षर पटेल उपकर्णधार असेल. 31 मार्च रोजी हा आगामी आयपीएल हंगाम सुरू होणार असून दिल्लीला त्यांचा पहिला सामना 1 एप्रिल रोजी खेळायचा आहे.
(In the absence of Rishabh Pant, his name can be seen on Delhi Capitals jerseys or caps says Ricky Ponting)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘माझ्यासोबत बसणार का?’, केएल राहुलची सिराजला मोठी ऑफर, डिलीट व्हायच्या आधी पाहून घ्या व्हिडिओ
सीएसकेच्या गोटात खळबळ! आयपीएल 2022 गाजवलेला गोलंदाज दुखापतग्रस्त, होऊ शकतो संपूर्ण हंगामातून बाहेर