यंदाच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने फायनलमध्ये चीनचा 1-0 असा पराभव 2024चे विजेतेपद पटकावले आहे. पहिले तीन क्वार्टर गोल शून्य राहिल्यानंतर अखेर भारताने चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये शानदार पुनरागमन करत 1-0 अशी आघाडी घेतली, जी शेवटपर्यंत कायम राहिली. भारताच्या जुगराजने या सामन्यातील एकमेव गोल केला. या विजयासह भारताने इतिहास रचला.
सामन्याच्या सुरुवातीलाच चीनने आक्रमक अंदाज स्वीकारत भारतीय बचावफळीला पिछाडीवर टाकले. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र दोन्ही वेळा चीनच्या गोलरक्षकाने आपला गोलपोस्ट सुरक्षित ठेवला. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वार्टरमध्येही दोन्ही संघांनी गोल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दरम्यान सामन्यातील एकमेव गोल 51 व्या मिनिटाला झाला.
या शानदार विजयासह भारताने सुवर्णपदक तर चीनने रौप्यपदक पटकावले आहे. भारत आणि चीन स्पर्धेच्या साखळी सामन्यात आमने-सामने आले होते, जिथे भारतीय संघाने 3-0 असा विजय मिळवला होता.
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी इतिहासात भारताने 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. तत्पूर्वी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2011 मध्ये सुरू झाली होती. जिथे भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानला पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 ने पराभूत करून विजेतेपद पटकावले. त्यानंतर 2016 मध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा 3-2 असा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. 2018 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले. 2023 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यात भारताने मलेशियाचा 4-3 असा पराभव केला होता., तर यंदा भारताने फायनल सामन्यात चीनचा पराभव करून 5 वे विजेतेपद पटकावले.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय शतके, जेव्हा इतर कोणत्याही फलंदाजाने केले नाही अर्धशतक
Women’s T20 World Cup : चॅम्पियन संघांना मिळणार छप्परफाड पैसा, टी20 विश्वचषकाच्या बक्षिस रक्कमेत लक्षणीय वाढ
“सर्व संघांना भारताला हरवण्यात मजा येते, पण…”, कसोटी मालिकेपूर्वी कर्णधार रोहितने भरली हुंकार