सध्या बुची बाबू स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेत भारतीय संघातून बाहेर असलेला यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने (Ishan Kishan) शानदार पुनरागमन केले आहे. बुची बाबू ट्रॉफीमध्ये झारखंडचा कर्णधार असलेल्या या फलंदाजाने दमदार खेळ दाखवला. पहिल्या डावात 114 धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात नाबाद 41 धावांची खेळी करत संघाला मध्य प्रदेशविरुद्ध 2 गडी राखून विजय मिळवून दिला.
बुची बाबू स्पर्धेत मध्य प्रदेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात किशनने संधीचा चांगला फायदा घेतला. आधी यष्टीरक्षक आणि नंतर फलंदाजीदरम्यान स्फोटकता दाखवली. पहिल्या डावात मध्य प्रदेशचा संघ 225 धावांवर सर्वबाद झाला, प्रत्युत्तरात झारखंडनं कर्णधार इशान किशनच्या (Ishan Kishan) 114 धावांच्या जोरावर 289 धावा केल्या. दुसऱ्या डावात मध्य प्रदेश संघ केवळ 238 धावा करू शकला आणि झारखंडला विजयासाठी 138 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
इशान किशनच्या (Ishan Kishan) नेतृत्वाखाली झारखंडने मध्य प्रदेशविरुद्ध चमकदार कामगिरी केली. किशनने पहिल्या डावात शानदार शतक झळकावले. दुसऱ्या डावात अडचणीत सापडलेल्या संघासाठी 41 धावांची नाबाद खेळी खेळली आणि सामना संपवला. मध्य प्रदेशविरुद्धच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झारखंडने 8 विकेट्स गमावल्या आणि त्यांना 12 धावांची गरज होती. अशा परिस्थितीत किशनने स्ट्राईक न देण्याचा निर्णय घेतला आणि 3 चेंडूत दोन षटकार मारून सामना संपवला.
Ishan Kishan – the hero of Jharkhand !!!
– Jharkhand needed 12 with 2 wickets in hands, captain smashed 6,0,6 to seal the game. pic.twitter.com/3uTqFF1KI2
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 18, 2024
किशनच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर भारतासाठी 2 कसोटी, 27 एकदिवसीय आणि 32 टी20 सामने खेळले आहेत. 2 कसोटी सामन्यात त्यानं 78च्या सरासरीनं 78 धावा केल्या. कसोटीत त्यानं 1 अर्धशतक झळकावलं आहे. त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 52 आहे. 27 एकदिवसीय सामन्यात किशननं 42.40च्या सरासरीनं 933 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 7 अर्धशतक, 1 शतक आणि 1 द्विशतक झळकावलं आहे. 32 टी20 सामन्यात त्यानं भारतासाठी 933 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 124.37 राहिला. टी20 मध्ये त्यानं 6 अर्धशतक झळकावली आहेत. टी20 मध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 89 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनी, कोहली की रोहित सर्वोत्तम कर्णधार कोण? बुमराहनं केला मोठा खुलासा
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी पॅट कमिन्सने घेतला मोठा ब्रेक, कारण जाणून व्हाल हैराण
पाकिस्तान सरकारनं हाॅकी दिग्गजांचा केला अपमान?