दुलीप ट्राॅफी (Duleep Trophy) स्पर्धा (5 सप्टेंबर) सुरु झाली आहे. तत्पूर्वी आज (7 सप्टेंबर) अनंतपुर येथे इंडिया-सी विरुद्ध इंडिया-डी यांच्यातील सामना संपला. या सामन्यात रुतुराज गायकवाडचा (Ruturaj Gaikwad) संघ इंडिया-सी ने इंडिया-डी चा 4 गडी राखून धुव्वा उडवला आणि दुलीप ट्राॅफी स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. हा सामना जिंकून इंडिया-सी गुणतालिकेत शीर्ष स्थानी पोहोचला आहे. या विजयासह त्यांनी गुणतालिकेत 6 गुण मिळवले आहेत.
तत्पूर्वी इंडिया-सी आणि इंडिया-डी यांच्यातील सामना (5 सप्टेंबर) पासून रंगला होता. इंडिया-सी चा कर्णधार रुतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) नाणेफेक जिंकून इंडिया-डी संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात पहिल्या डावात इंडिया-डी संघ 164 धावांवर सर्वबाद झाला. इंडिया-डी साठी अक्षर पटेलने (88) धावांची खेळी केली. दरम्यान त्याने 6 चौकारांसह 6 उंत्तुग षटकार ठोकले. यष्टीरक्षक श्रीकर भरत (13), सारांश जैन (13) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) (8) धावांची खेळी केली. यांच्या जोरावर इंडिया-डी 164 धावा करू शकला.
इंडिया-सी साठी विजयकुमार वैशाकने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. अंशुल कंबोज, हिमांशु चौहानने प्रत्येकी 2-2 विकेट्स त्यांच्या नावावर केल्या. मानव सुथार आणि ह्रीतिक शोकीनने 1-1 विकेट घेतली.
पहिल्या डावात इंडिया-सी संघ 168 धावांवरती सर्वबाद झाला. त्यामध्ये कर्णधार रुतुराज गायकवाड (5) धावांवरती तंबूत परतला. इंद्रजितने इंडिया-सी साठी (72) धावांची शानदार खेळी केली. त्याने 9 चौकार लगावले. यष्टीरक्षक अभिषेक पोरेल (34), रजत पाटीदार (13) आणि आर्यन जुयाल (12) धावांच्या खेळीवर इंडिया-सी 168 धावांवरती गारद झाला. इंडिया-डी साठी पहिल्या डावात वेगवान गोलंदाज हर्षित राणाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. अक्षर पटेल, सारांश जैन यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या, तर अर्शदीप सिंग आणि आदित्य ठाकरे यांनी 1-1 विकेट मिळवली.
दुसऱ्या डावात फलंदाजी करताना इंडिया-डी संघ 236 धावांवरती सर्वबाद झाला. त्यामध्ये कर्णधार श्रेयस अय्यरने चमकदार फलंदाजी केली. त्याने (54) धावांची अर्धशतकी खेळी केली. देवदत पडीक्कलने (56) धावांची सर्वोत्कृष्ट खेळी केली. दरम्यान त्याने 8 चौकार लगावले. भुई (44), अक्षर पटेल (28) आणि श्रीकर भरतने (16) धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात इंडिया-सी साठी मानव सुथारने धमाकेदार गोलंदाजीचे प्रदर्शन दाखवत 7 विकेट्स घेतल्या. तर विजयकुमार वैशाक 2 आणि अंकुश कंबोजने 1 विकेट त्याच्या नावावर केली.
जिंकण्यासाठी 233 धावांचे लक्ष्य ठेवून मैदानात उतरलेल्या इंडिया-सी संघाने 4 गडी राखून शानदार विजय मिळवला. इंडिया-सी साठी कर्णधार रुतुराज गायकवाडने (46) धावा ठोकल्या. दरम्यान त्याने 8 चौकार लगावले. आर्यन जुयालने (47) धावांची शानदार खेळी खेळली. त्याच्या खेळीत त्याने 3 चौकार आणि 1 उत्तुंग षटकार ठोकला. रजत पाटीदार (44), अभिषेक पोरेल (35), धावांच्या जोरावर इंडिया-सी ने पहिल्याच सामन्यात 4 गडी राखून विजय शानदार विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटच्या नियमांची खिल्ली, चक्क थर्ड अंपायरशिवाय झाला आंतरराष्ट्रीय सामना!
वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टाॅप-5 गोलंदाज
गंभीरच्या आवडत्या खेळाडूची दुलीप ट्रॉफीमध्ये कमाल, भारतीय संघात कमबॅक निश्चित!