Shubman Gill Captain North Zone: नुकतीच भारत आणि इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. त्यानंतर आता दुलीप ट्रॉफी 2025-26 साठी शुबमन गिल उपलब्ध झाला आहे आणि त्याच्याकडे नॉर्थ झोन संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नॉर्थ झोनने या स्पर्धेसाठी आपले स्क्वाड जाहीर केले आहे. ही फर्स्ट-क्लास क्रिकेट टूर्नामेंट 28 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान खेळवली जाईल. (Shubman Gill captain North Zone)
गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अलीकडेच इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका 2-2 अशी ड्रॉ केली आणि भारतात परतला आहे. आता गिलपुढे आणखी एक आव्हान उभं राहिलं आहे, जिथे त्याला 17 वेळा चॅम्पियन ठरलेल्या नॉर्थ झोन संघाच्या प्रतिष्ठेला टिकवून ठेवावं लागेल. (Shubman Gill Duleep Trophy 2025)
मागील सीझनमध्ये दुलीप ट्रॉफीत इंडिया ए, इंडिया बी, इंडिया सी आणि इंडिया डी असे संघ होते, पण यंदा पुन्हा एकदा ही स्पर्धा आपल्या पारंपरिक झोनल फॉरमॅटमध्ये खेळवली जात आहे.
नॉर्थ झोनच्या संघात अर्शदीप सिंगचा देखील समावेश आहे, ज्याला इंग्लंड दौऱ्यावर एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. (Arshdeep Singh Duleep Trophy) त्याचबरोबर अंशुल कंबोज आणि हर्षित राणा हेही संघाचा भाग असतील.
शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली नॉर्थ झोन संघ दिलीप ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये ईस्ट झोनशी भिडेल. विशेष म्हणजे ईस्ट झोनच्या संघाचे नेतृत्व ईशान किशन करत आहे आणि हा सामना 28 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. (Duleep Trophy 2025-26 schedule)
दुलीप ट्रॉफी 2025-26 साठी नॉर्थ झोन संघ (North Zone squad Duleep Trophy)
शुबमन गिल (कर्णधार), शुभम खजूरिया, अंकित कुमार (उपकर्णधार), आयुष बदोनी, यश धूल, अंकित कलसी, निशांत सिंधु, साहिल लोत्रा, मयंक डागर, युद्धवीर सिंग चरक, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अंशुल कंबोज, औकिब नबी, कन्हैया वधावन






