पुणे (8 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आजचा पहिला सामना चौथ्या क्रमांक वर असलेल्या नांदेड व सहाव्या क्रमांकावर असलेल्या धुळे यांच्यात लढत झाली. सामन्याचा सुरुवातीलाच दोन्ही संघाच्या बचावपटूंनी गुण मिळवत आपला बचावात्मक पवित्रा स्पष्ट केलं. 9 मिनिटानंतर 5-5 असा सामना बरोबरीत होता.
नांदेडच्या याकुब पठाण ने चढाईत तर मोहसीन पठाण व सौरभ राठोड यांनी पकडीत गुण मिळवत धुळे संघाला ऑल आऊट केले. धुळेच्या जैवर्धन गिरासे ने सुपर रेड करत संघाची पिछाडी कमी केली. मध्यंतराला नांदेड संघाकडे 14-11 अशी आघाडी होती. मध्यंतरा नंतर आपली आघाडी कायम ठेवत नांदेड संघाने आपली सामन्यावर पकड मजबूत केली. मोहसीन पठाण ने जबरदस्त पकडीचा नमुना दाखवत हाय फाय पूर्ण केला.
उत्तरार्धात धुळे संघाने चांगला खेळ करत आपली पिछाडी मोठी होऊ न देता शेवट पर्यत आपले प्रयत्न सुरू ठेवले होते. शेवटच्या चढाई पूर्वी 23-26 अशी पिछाडी असताना वैभव बोरसे ने अंतिम चढाईत 4 खेळाडूंना बाद करत नांदेड संघाला ऑल आऊट केला. जवळपास हरलेल्या सामना 29-26 असा जिंकला. वैभव बोरसे विजयाचा शिल्पकार ठरला. 1 सुपर टॅकल सह पकडीत 5 गुण मिळवत हाय फाय पूर्ण केला. तर अंतिम चढाईत सुपर रेड करत संघाला दुसरा विजय मिळवून दिला. नांदेड संघाला अंतिम क्षणाला हलगर्जीपणा त्याना महागात पडला.
बेस्ट रेडर- याकुब पठाण, नांदेड
बेस्ट डिफेंडर- मोहसीन पठाण, नांदेड
कबड्डी का कमाल- वैभव बोरसे, धुळे
महत्वाच्या बातम्या –
महाविक्रम! अँडरसन बनला 700 कसोटी विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज, लवकरच शेन वॉर्नला टाकणार मागे
धरमशाला कसोटीत टीम इंडिया ऑलआऊट, भारताकडे 259 धावांची मोठी आघाडी