---Advertisement---

WPL 2025: रिचा घोषने मैदान गाजवलं, आरसीबीने गुजरातचा धुव्वा उडवत रचला इतिहास!

---Advertisement---

महिला प्रीमियर लीगला (Women Premier League) (14 फेब्रुवारी) पासून सुरूवात झाली. दरम्यान गतविजेता संघ राॅय चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात जायंट्स (Gujrat Giants) या दोन्ही संघात या हंगामातील पहिला सामना खेळला गेला. 2025च्या पहिल्या सामन्यात बंगळुरूने गुजरातचा 6 गडी राखून धुव्वा उडवला. गतविजेत्या आरसीबीने हंगामाची सुरुवात मोठ्या विजयाने केली आहे. डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सामन्यात, गुजरातने प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 20 षटकांत 201 धावा केल्या. प्रत्युत्तरात, बंगळुरूने 9 चेंडू शिल्लक असताना शानदार विजय मिळवला. बंगळुरूकडून एलिस पेरीने (Ellyse Perry) (57 धावा), रिचा घोषने (Richa Ghosh) (नाबाद 64 धावा) करत आरसीबीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

वडोदऱ्यातील कोताम्बी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीची कर्णधार स्म्रीती मानधनाने (Smriti Mandhana) टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना 201 धावा धावफलकावर लावण्यात गुजरातला यश आले. पण दुसऱ्या डावात दव पडल्यामुळे गोलंदाजी करणे कठीण झाले. आरसीबीने मानधना (9 धावा) आणि डॅनिएल वायट (4 धावा) यांच्या विकेट लवकर गमावल्या. पण एलिस पेरी आणि रिचा घोष यांनी परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला आणि आरसीबीला धमाकेदार विजय मिळवून दिला.

महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात आरसीबी हा सर्वाधिक धावांचा पाठलाग करणारा संघ बनला आहे. महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात 200 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग करणारा आरसीबी हा पहिला संघ आहे. यापूर्वी हा रेकाॅर्ड मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) नावावर होता, ज्यांनी 2024 मध्ये गुजरात जायंट्सविरुद्ध (Gujrat Gaints) 191 धावांचे लक्ष्य गाठले होते. गुजरातसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे की, डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील 4 सर्वात मोठे पाठलाग फक्त गुजरात संघाविरुद्धच झाले आहेत.

महिला प्रीमियर लीगमध्ये शेवटच्या 4 सामन्यांमध्ये आरसीबीचा पराभूत झालेला नाही. बंगळुरूने त्यांचे शेवटचे तीन्ही सामने जिंकून
(WPL 2024) मध्ये विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली. त्याच वेळी, (WPL 2025)चा पहिला सामना जिंकून, त्यांनी आपला विजयी रथ 4 सामन्यांपर्यंत वाढवला आहे.

पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग 11-

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- स्म्रीती मानधना (कर्णधार), डॅनिएल वायट, एलिस पेरी, राघवी बिस्ट, रिचा घोष, कनिका आहुजा, जॉर्जिया वेअरहॅम, किम गार्थ, प्रेमा रावत, जोशिता व्हीजे, रेणुका ठाकूर सिंग

गुजरात जायंट्स- लॉरा वोल्वार्ड, बेथ मुनी, दयालन हेमलता, अ‍ॅशले गार्डनर (कर्णधार), डिआंड्रा डॉटिन, हरलीन देओल, सिमरन शेख, तनुजा कंवर, सायली सातघरे, प्रिया मिश्रा, काशवी

महत्त्वाच्या बातम्या-

सलग दुसर्‍यांदा महाराष्ट्राच्या पदकाचे व्दिशतक
माजी क्रिकेटपटूने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडली भारताची प्लेइंग 11, पण ‘या’ दिग्गजाला वगळले
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ 3 संघांकडे आहेत, सर्वात उत्कृष्ट फिरकीपटू! पाहा यादी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---