आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीची (ICC Champions Trophy 2025) सुरूवात (19 फेब्रुवारी) रोजी होईल. दरम्यान भारतीय संघ (20 फेब्रुवारी) पासून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. पहिल्या सामन्यात भारताचा सामना बांगलादेशशी होईल. यानंतर संघाचा सामना त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल.
दरम्यान कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) संघातील हा सामना (23 फेब्रुवारी) रोजी होणार आहे. तत्पूर्वी एका माजी भारतीय दिग्गजाने या स्पर्धेसाठी भारतीय संघाची प्लेइंग-11 निवडली आहे. या प्लेइंग-11 मध्ये त्याने स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची (Mohammed Shami) निवड न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. शमीच्या जागी दुसऱ्या वेगवान गोलंदाजाचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.
2 वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या सुरेश रैनाने (Suresh Raina) मोहम्मद शमीला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय प्लेइंग-11 मध्ये स्थान दिलेले नाही. स्टार स्पोर्ट्सशी झालेल्या संभाषणात, सुरेश रैनाने 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याची प्लेइंग इलेव्हन निवडली. त्याने वेगवान गोलंदाजांच्या निवडीमध्ये आश्चर्यकारक निर्णय घेतला, ज्यामध्ये संघात हर्षित राणा (Harshit Rana) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) या जोडीचा समावेश होता. त्याच वेळी, तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून हार्दिक पंड्याची (Hardik Pandya) भूमिका देखील अधोरेखित करण्यात आली.
त्याच्या प्लेइंग-11 मध्ये हर्षित राणाला समाविष्ट करण्याबाबत रैना म्हणाला, “हर्षित राणामध्ये विविधता आहे. त्याच्याकडे हळू बाउन्सर आहे आणि तो स्विंग करू शकतो. हार्दिक पांड्या महत्त्वाची भूमिका बजावेल. आम्ही अजून त्याचा फारसा विचार केलेला नाही. पुढे रैना म्हणाला, “अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा मधल्या षटकांमध्ये चांगली कामगिरी करतील, तर कुलदीप यादव विकेट घेण्यास हातभार लावू शकतो.”
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी सुरेश रैनाचा भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ 3 संघांकडे आहेत, सर्वात उत्कृष्ट फिरकीपटू! पाहा यादी
RCB vs GG: RCBने जिंकला टाॅस; गोलंदाजीचा निर्णय! जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर का पडला? माजी दिग्गजाने सांगितलं खरं कारण