आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीची (ICC Champions Trophy 2025) सुरूवात (19 फेब्रुवारी) पासून होणार आहे. त्यामध्ये भारतीय संघ (20 फेब्रुवारी) रोजी बांगलादेशशी सामना खेळून आपल्या मोहिमेला सुरूवात करेल. तत्पूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे बाहेर पडल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती. माजी क्रिकेटपटू आणि विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी बुमराहच्या दुखापतीबद्दल मोठे विधान केले आहे. दरम्यान त्यांनी बुमराहच्या दुखापतीचे खरे कारणही सांगितले आहे.
विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी भारतीय क्रिकेटपटूंमध्ये वाढत्या दुखापतींबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि खेळाडू वर्षातील सुमारे 10 महिने खेळत असलेल्या व्यस्त कॅलेंडरला याचे श्रेय दिले आहे. बेंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आजकाल खेळाडूंसाठी पुनर्वसन केंद्र बनले आहे, जिथे खेळाडू सरावापेक्षा पुनर्प्राप्तीसाठी जास्त वेळ घालवत आहेत.
“मला काळजी वाटते ती म्हणजे तो वर्षातून 10 महिने खेळत असतो,” असे 1983च्या विश्वचषक विजेत्या कपिल देव यांनी टाटा स्टील गोल्फ पुरस्कार सोहळ्यात सांगितले. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बुमराहची उणीव भासेल का? असे विचारले असता, त्यांनी खेळाडूंना दुखापतग्रस्त खेळाडूंवर अवलंबून राहण्याऐवजी एकमेकांना पाठिंबा देण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले.
पुढे बोलताना कपिल देव म्हणाले, “संघात नसलेल्या व्यक्तीबद्दल का बोलायचे, हा एक सांघिक खेळ आहे आणि संघाला जिंकायचे आहे, व्यक्तींना नाही. हे बॅडमिंटन, टेनिस किंवा गोल्फ नाहीये, आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एका सांघिक खेळात भाग घेत आहोत, जर आम्ही एक संघ म्हणून खेळलो तर आम्ही निश्चितच जिंकू.”
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्य ट्राॅफीमध्ये भारतीय संघात निवड न झाल्याने संतापला ‘हा’ खेळाडू! म्हणाला…
महाराष्ट्र केसरी ठरले पदकाचे मानकरी, हर्षवर्धन, अमृताला कास्यपदक
७१व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ जाहीर