मायदेशातील वनडे मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही तीन सामन्यांची वनडे मालिका गुरुवारी (28 डिसेंबर) सुरू झाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स राखून विजय मिळवला. फिबी लिचफिल्ड सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.
उभय संघांतील या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक गमावल्यानंतर त्यांना प्रथम गोलंदाजी करावी लागली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 283 धावांचे लक्ष्य मिळाले होते. सलामीवीर एलिसा हिली स्नेहा राणाने जबरदस्त झेल पकडल्यामुळे शुन्यावर बाद झाली. पण फिवी लिचफिल्ड आणि एलिस पेरी यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी झाली. एलिस पेरीने 72 चेंडूत 75 धावांची खेली केल्यानंतर विकेट गमावली आणि ऑस्ट्रेलियाला दुरसा झटका बसला. त्यानंतर तिसऱ्या विकेटच्या रुपात फिबी तंबूत परतली, जिने 89 चेंडूत 78 धावांची सर्वोत्तम खेळी साकारली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बेथ मुनी हिनेही 47 चेंडूत 42 धावा कुटल्या. पाचव्या क्रमांकावर खेळताना ताहलिया मॅकग्रा हिने 55 चेंडूत 68 धावांची वेगवान खेळी केली आणि संघाला 46.3 षटकांमध्ये विजय मिळवून दिला. 6 विकेट्स राखून ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला आणि मालिकेत 0-1 अशी आघाडीही घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने 50 षटकांमध्ये 8 विकेट्सच्या नुकसानावर 282 धावा केल्या होत्या. यात जेमिमाह रॉड्रिग्ज हिने 77 चेंडूत 82 धावांची सर्वोत्तम खेळी केली होती. तसेच सलामी फलंदाज यास्तिका भाटिया हिने 64 चेंडूत 49 धावांचे योगदान दिले होते. ऑस्ट्रेलियासाठी ऍशले गार्डनर आणि जॉर्जिया वेरेहॅम यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. ऍलाना किंग, एनाबेल सदरलँड, मेगन शट, डार्सी ब्राऊन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट नावावर केली. ऑस्ट्रेलियाच्या विजयात त्यांच्या गोलंदाजी आक्रमाणाचे योगदान महत्वाचे ठरले, ज्यांनी भारताला निर्धारित धावसंख्येवर रोखले. (In the first ODI against Australia, the Indian women’s team lost by 6 wickets)
पहिल्या वनडे सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारतीय महिला संघ-
जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), स्नेह राणा, अमनजोत कौर, रिचा घोष, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक
ऑस्ट्रेलिया महिला संघ-
फीबी लिचफील्ड, एलिसा हिली (यष्टीरक्षक/कर्णधार), एलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, ऍशले गार्डनर, एनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरेहॅम, अलाना किंग, मेगन शट, डार्सी ब्राऊन
महत्वाच्या बातम्या –
फ्लाईंग कॅच! सामन्याच्या पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलिया झटका, स्नेह राणाच्या चपळाईमुळे एलिसा हिली तंबूत
पहिलं कसोटी शतक करण्याची संधी यान्सेनच्या हातून निसटली! पहिल्या डावाअंती दक्षिण आफ्रिका 163 धावांनी आघाडीवर