---Advertisement---

IND vs ENG: लॉर्ड्सवर केएल राहुल भारताचा कर्णधार? सामन्यादरम्यान कर्णधार बदलण्याबाबत काय आहे आयसीसीचा नियम?

On: शुक्रवार, जुलै 11, 2025 6:14 PM
---Advertisement---

India vs England 3rd Test: भारत आणि इंग्लंड संघातील तिसरा कसोटी लॉर्ड्सवर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ गोलंदाजीसाठी मैदानात उतरला. पण सामन्यादरम्यान असे काही घडले की, त्यावेळी भारताचा कर्णधार गिल किंवा उपकर्णधार पंत संघाची धुरा सांभाळत नव्हते, तर लॉर्ड्समध्ये संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल सर्व निर्णय घेताना दिसला. सामन्याच्या मध्यात कर्णधार बदलण्याबाबत काय नियम आहेत, चला तर मग या बातमीद्वारे आपण जाणून घेऊयात. (Lord’s Test India England)

भारत-इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या सत्रादरम्यान शुबमन गिलला काही वेळासाठी मैदान सोडावे लागले, त्यानंतर भारताचा सलामीचा फलंदाज केएल राहुलने संघाची कमान सांभाळली. अशा स्थितीत आयसीसीचा नियम सांगतो की, जर कर्णधार मैदानावर उपस्थित नसेल, तर उपकर्णधाराला संघाची जबाबदारी घ्यावी लागते आणि सर्व आवश्यक निर्णय घ्यावे लागतात. (ICC rules captain change)

शुबमन गिल जेव्हा सामना सोडून बाहेर गेला, तेव्हा भारताचा उपकर्णधार रिषभ पंतही मैदानावर उपस्थित नव्हता. पंतच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे तो मैदानाच्या बाहेर गेला होता आणि त्याच्या जागी ध्रुव जुरेल यष्टीरक्षण करताना दिसला. अशा स्थितीत गिलच्या जागी पंतही कर्णधारपद सांभाळू शकला नाही. (Rishabh Pant injury update)

आयसीसीच्या नियमांनुसार, जर कर्णधार आणि उपकर्णधार दोघेही मैदानावर उपस्थित नसतील, तर संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक काही काळासाठी कोणाला संघाची जबाबदारी द्यायची, याचा निर्णय घेतात. हा तो खेळाडू असतो जो संघातील अनुभवी खेळाडू आहे. केएल राहुलला त्याच्या अनुभवाच्या आधारावर संघाची जबाबदारी देण्यात आली. आता लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शुबमन गिल पुन्हा भारताचे कर्णधारपद भूषवत आहे. परंतु संघाचा डावखुरा फलंदाज खेळाडू रिषभ पंत दुखापतीमुळे अजूनही मैदानावर परतलेला नाही. त्यामुळे पंत आता कधी मैदानावर परतेल हे पाहणे देखील महत्वाचे ठरेल. (ICC rules captain change)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---