पुणे (24 मार्च 2024) – आजचा तिसरा सामना बीड विरुद्ध कोल्हापूर यांच्यात झाला. कोल्हापूर संघ 5 विजयासह प्रमोशन फेरीत दुसऱ्या क्रमांकावर होता तर बीड संघ सलग पाच पराभव सह गुणतालिकेत आठव्या स्थानावर होता. दोन्ही संघानी सावध सुरुवात केली होती. 10 मिनिटाच्या खेळानंतर सामना 7-7 असा बरोबरीत सुरू होता. त्यानंतर कोल्हापूर संघाने थोडी आक्रमकता दाखवत गुण मिळवत मध्यंतराला चार मिनिटं शिल्लक असताना बीड संघाला ऑल आऊट करत आघाडी मिळवली.
कोल्हापूर संघाने मध्यंतराला 20-15 अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर बीड संघाने पलटवार करत मध्यंतरा नंतर चौथ्या मिनिटाला कोल्हापूर संघावर लोन टाकत सामना 21-22 असा जवळ आणला होता. त्यानंतर मात्र कोल्हापूरच्या ओमकार पाटील व सौरभ फगारे यांनी अक्षरशः बीड संघाला सळो की पळो करून ठेवला. शेवटच्या 15 मिनिटामध्ये कोल्हापूर संघाने तब्बल चार वेळा बीड संघाला ऑल आऊट करत सामना एकतर्फी केला. कोल्हापूरच्या चढाईपटू व बचावपटूंनी उत्कृष्ट खेळ केला.
कोल्हापूर संघाने 22-21 वरून सामना 61-25 असा जिंकला. कोल्हापूरच्या ओमकार पाटील ने चढाईत 15 गुण तर सौरभ फगारे ने 11 गुण मिळवत संघाचा विजय सुकर केला. चंद्रकांत जगताप ने सुद्धा 2 सुपर रेडसह 8 गुण मिळवले. वैभव राबाडे ने पकडीत एकूण 6 गुण मिळवले. साईप्रसाद पाटील ने 4 तर दादासो पुजारीने 3 पकडीत गुण मिळवले. (In the last 15 minutes, the Kolhapur team blew away the Beed team)
बेस्ट रेडर- ओमकार पाटील, कोल्हापूर
बेस्ट डिफेंडर- वैभव राबाडे, कोल्हापूर
कबड्डी का कमाल – चंद्रकांत जगताप, कोल्हापूर
महत्वाच्या बातम्या –
तिसऱ्या विजयासह नंदुरबार संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी
प्रमोशन फेरीत अहमदनगर संघाचा विजयचा षटकार