आयपीएल 2023 हंगामात फलंदाज धमाकेदार प्रदर्शन करत आहेत. हंगाम सुरू होऊन अवघे काहीच दिवस झाले आहेत. पण एकापेक्षा एक सामने चाहत्यांना पाहायला मिळाले आहेत. तीन वर्षांनंतर आयपीएल भारतात आयोजित केली गेल्याने भारतीय फलंदाजांना अधिक फायदा मिळत असल्याचेही दिसते. मागच्या एका आठवड्याचा विचार केला, तर भारतीय फलंदाजांनी आयपीएलमद्ये अक्षरशः गदारोळ घातला आहे. रविवारी (9 एप्रिल) रिंकू सिंग याने अविश्वसनीय खेळी करत केकेआरली विजय मिळवून दिला.
मागच्या आठवड्यात आयपीएलमध्ये भारतीय फलंदाजांचे तोडफोट प्रदर्शन
राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याच्यासाठी यावर्षीची आयपीएल खास राहणार, असेच दिसते. त्याने मागच्या आठवड्यात अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन केले. शुक्रवारी (8 एप्रिल) दिल्ली कॅफिटल्सविरुद्धच्या सामन्यात जयसवालने 31 चेंडूत 60 धावांची महत्वापूर्ण खेळी केली. तसेच शुक्रवारीच केकेआरसाठी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) चमकादर प्रदर्शन करताना दिसला. रहाणेने 21 चेंडूत 61 धावा कुटल्या. आयपीएलच्या इतिहासात रहाणेने सीएसकेसाठी खेळलेला हा पहिलाच सामना होत्या. या सामन्यात त्याने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक केले, जे हंगामात आतापर्यंतचे सर्वात वेगवान अर्धशतकही ठरले.
रविवारी (9 एप्रिल) गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना फारच रोमांचक ठरला. भारताच्या तीन फलंदाजांनी या सामन्यात मोठी आणि महत्वपूर्ण खेळी केली. गुजरातने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि विजय शंकर (Vijay Shankar) एक नवीन फिनिशर म्हणून पुढे आला. शंकरने 24 चेंडूत 63 धावा केल्या. त्याने शेललेल्या शेवटच्या 11 चेंडूत 41 धावा साकारल्या आणि संघाची धावसंख्या 204 पर्यंत नेली. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरसाठी अष्टपैलू वेंकटेश अय्यर याने 40 चेंडूत 83 धावा कुटल्या. शेवटच्या षटकांमध्ये केकेआरसाठी विजयाच्या आशा संपल्या होत्या. पण रिंकू सिंग (Rinku Singh) याच्या धमाकेदार प्रदर्शनामुळे संघ जिंकला. रिंकूने 21 चेंडूत 48 धावा केल्या. शेवटच्या पाच चेंडूत विजयासाठी 28 धावा हव्या होत्या. अशा दबावाच्या परिस्थितीत रिंकून सलग पाच षटकार मारले आणि सामना जिंकला.
रविवारच्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबात संघ आमने सामने होते. पंजाबने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याने नाबाद 99 धावा केल्या. अवघी एक धाव कमी पडल्याने धवनचे शतक हुकले. तसेच लक्ष्याच पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबद संघाकडून राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याने 38 चेंडूत 74 धावांची अप्रतिम खेळी केली आणि संघाला विजय देखील मिळवून दिला. (In the last one week, these seven Indian batsmen have performed tremendously in the IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंजाबला नमवत सनरायझर्सने खोलले विजयाचे खाते! मार्कंडे-त्रिपाठी ठरले नायक
सफाई कामगार बनता-बनता राहिला रिंकू सिंग! केकेआरच्या विश्वासामुळे बनला स्टार क्रिकेटपटू