---Advertisement---

DC vs LSG: दिल्लीविरूद्ध रिषभ पंत पुन्हा शून्यावर बाद! मालक संजीव गोयंकांची प्रतिक्रिया व्हायरल

On: मंगळवार, एप्रिल 22, 2025 10:22 PM
---Advertisement---

यंदाच्या आयपीएल हंगामातील 40वा सामना आज (22 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स (DC vs LSG) संघात खेळला जात आहे. या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सचा (LSG) कर्णधार रिषभ पंतच्या (Rishabh Pant) बॅटने पुन्हा एकदा निराशा केली. पंतची बॅट त्याच्या जुन्या संघाविरुद्ध पुन्हा एकदा शांत राहिली आणि तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यंदाच्या आयपीएल हंगामातील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही पंतला खाते उघडता आले नाही.

मंगळवारी (22 एप्रिल) एकाना स्टेडियमवर शेवटच्या षटकात पंत फलंदाजीला आला. त्याने फक्त 2 चेंडूंचा सामना केला. मुकेशच्या या षटकात पंत पाचव्या चेंडूवर बीट झाला, तर सहाव्या चेंडूवर त्याने रिव्हर्स स्कूप खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू पॅडवर आदळला आणि विकेटवर गेला. पंत बाद झाल्यानंतर लखनऊ सुपरजायंट्सचे मालक संजीव गोयंका यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले. संजीव गोएंका यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रिषभ पंतने आतापर्यंत 9 सामन्यांमध्ये फक्त 106 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये सर्वोच्च 63 धावांचा समावेश आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 49 चेंडूत 63 धावांची खेळी केली. पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे, लखनऊने मेगा लिलावात त्याला 27 कोटी रुपयांना खरेदी केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---