भारत आणि बांगलादेश यांच्यातील विश्वचषक सामना गुरुवारी (19 ऑक्टोबर) पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आयोजित केला गेला. उभय संघांतील या सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यानंतर संघाला प्रथम गोलंदाजी करावी लागली. बांगलादेशसाठी सलामीवीर लिटन दास आणि तनजीद हसन यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. विश्वचषकाच्या इतिहासात या दोघांनी भारताविरुद्ध खेळताना खास कामगिरी या सामन्यात केली. बांगलादेश संघ प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 256 धावांपर्यंत मजल मारू शकला.
लिटन दास (Liton Das) याने 66, तर तनजीत हसन (Tanzid Hasan) याने 51 धावांची खेळी केल्यानंतर विकेट गमावल्या. बांगलादेशला पहिला झटका बसला तो तनजीद हसनच्या रुपात. तनजीमला कुलदीप यादवने पायचीत पकडले. सलामीवीर फलंदाजांमध्ये पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. विश्वचषक इतिहासात ही केवळ चौथी वेळ आहे, ज्या सामन्यात भारताच्या विरुद्ध खेळणाऱ्या संघासाठी सलामीवीर फलंदाजांनी 50पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली असेल.
विश्वचषकात 1992 साली सर्वात पहिल्यांदा दक्षिण आफ्रिका संघाने अशी कामगिरी केली होती. 1992 विश्वचषकात सलामीवीर अँड्र्यू हडसन आणि पीटर क्रिस्टन यांनी पहिल्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर 1996 साली झालेल्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मार्क वॉ आणि मार्क टायलर यांनी पहिल्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली होती. न्यूझीलंडच्या जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी 2019 विश्वचषकात भारताविरुद्ध पहिल्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर आता 2023 विश्वचषकात बांगलादेशच्या तनजीद आणि लिटनने पहिल्या विकेटसाठी 50 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली.
विश्वचषकात भारताविरुद्ध 50 धावांपेक्षा मोठी भागीदारी करणारे सलामीवीर फलंदाज (88 सामन्यांमध्ये)
अँड्र्यू हडसन 53 आणि पीटर क्रिस्टन 84, (दक्षिण आफ्रिका 1992)
मार्क वॉ 126 आणि मार्क टायलर 59, ( ऑस्ट्रेलिया 1996)
जेसन रॉय 66 आणि जॉनी बेअरस्टो 111, (इंग्लंड 2019)
तनजीद हसन 51 आणि लिटन दास 66, (बांगलादेश 2023)
दरम्यान, भारतीय संघासाठी ही आकडेवारी चिंताजनक आहे. वरील यादीतीली पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. अशात गुरुवारी खेळल्या गेलेल्या चौथ्या सामन्यात भारताला पराभव मिळणार की, संघ पाहुण्या बंगालदेशवर मात करणार हे पाहण्यासारखे असेल. (In the match against India, the Bangladesh openers did a special performance)
विश्वचषकातील 17व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
बांगलादेश- लिटन दास, तनजीद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मेहदी हसन मिराज, तौहिद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्लाह, नसूम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम.
महत्वाच्या बातम्या –
“आपल्याला मेडल पाहिजे”, ‘फ्लाईंग कॅच’ टिपताच जडेजाची फिल्डिंग कोचकडे मागणी
बांगलादेशी यष्टीरक्षकाने रचला इतिहास, विश्वचषकात ‘असा’ विक्रम करणारा ठरला दुसराच क्रिकेटपटू