गुरूवारी (19 ऑक्टोबर) विश्वचषक 2023 मधील 17 वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा चुरशीचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेश संघाने निर्धारित षटकात 8 विकेट्स गमावून 256 धावा केल्या आहेत. बांगलादेश संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim) याच्यासाठी हा सामना खूपच खास ठरला आहे. या सामन्यात त्याने एकदिवसीय विश्वचषक कारकिर्दीतील 1000 धावा पूर्ण केल्या आहेत.
बांगलादेशचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने बांगलादेशच्या डावाच्या 31व्या षटकात हा टप्पा गाठला. विश्वचषकामध्ये 1000 धावा करणारा तो बांगलादेशचा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी हा पराक्रम संघाचा कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) याने केला होता. शाकिबने विश्वचषकात आपल्या कारकिर्दीत 1201 धावा केल्या आहेत. मुशफिकुरबद्दल बोलायचे झाले तर त्याने त्याच्या कारकिर्दीतील 33व्या विश्वचषक सामन्यात हा टप्पा गाठला आहे. या काळात त्याने 1 शतक आणि 8 अर्धशतके झळकावली आहेत.
मुशफिकुर हा बांगलादेश संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत संघासाठी अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत. 2023 च्या विश्वचषकातही त्याची बॅट चमकदार कामगिरी करत आहे. या विश्वचषकात त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत. आज भारताविरुद्धही त्याने 38 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली आणि संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठण्यात मदत केली.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर बांगलादेश संघाने भारताविरुद्ध चांगली सुरुवात केली. संघाचे दोन्ही सलामीवीर तनजीद हसन आणि लिटन दास यांनी शानदार फलंदाजी करत अर्धशतके झळकावली. मात्र, भारतासाठी कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने दमदार पुनरागमन करत 93 धावांवर तनजीद हसनला (51) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघ हा सामनाही जिंकेल अशी चाहत्यांना आशा आहे. (Mushfiqur Rahim created history, became the second player to achieve such a record in the World Cup)
महत्वाच्या बातम्या –
लिटन-तंझीदने बांगलादेशसाठी केला मोठा पराक्रम, तब्बल 25 वर्षानंतर वर्ल्डकपमध्ये…
“माझ्यावर पाकिस्तानात हल्ला झालेला”, इरफानचा 17 वर्षांनी गौप्यस्फोट, वाचा सविस्तर