ODI World Cup 2023क्रिकेटटॉप बातम्या

“माझ्यावर पाकिस्तानात हल्ला झालेला”, इरफानचा 17 वर्षांनी गौप्यस्फोट, वाचा सविस्तर

वनडे विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या सामन्याची सातत्याने चर्चा होत आहे. अहमदाबाद येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला होता. त्यानंतर पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी केलेल्या काही आरोपांना आता भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने प्रत्युत्तर दिले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात जवळपास एक लाखांपेक्षा जास्त प्रेक्षकांचा भारतीय संघाला थेट पाठिंबा होता. तसेच मैदानावर सातत्याने भारतीय संघाला प्रेरित करणारी गाणी वाजवली जात होती. तर, काही चाहत्यांनी पाकिस्तानी खेळाडूंना लक्ष करत काही टिप्पणी देखील केल्या होत्या. त्यावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी नाराजी व्यक्त करत भारतीय प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीचा त्रास होत असल्याचे म्हटलेले.

भारत आणि बांगलादेश या सामन्यादरम्यान समालोचन करताना यावर व्यक्त होताना भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण म्हणाला,

“पाकिस्तानचे प्रशिक्षक हे मुख्य गोष्टीवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. चाहत्यांना त्यांचे काम करू द्यावे. आम्ही ज्यावेळी 2006 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता तेव्हा आम्हाला असे अनुभव आलेले. त्यावेळी पेशावर येथील वनडे सामन्यात मी सीमारेषेजवळ क्षेत्रक्षण करत असताना मला खिळा फेकून मारण्यात आलेला. तो माझ्या डोळ्याजवळ लागलेला. आम्ही त्यावर जास्त लक्ष दिले असते तर तो दौरा पूर्ण होऊ शकला नसता. केवळ दहा मिनिटे तो सामना थांबला आणि आम्ही त्यानंतर पूर्ण मालिका खेळून मालिका जिंकली.”

इरफानच्या गौप्यस्फोटाने आता नवी चर्चा सुरू झाली आहे.

(Irfan Pathan Big Reveal On India Tour Of Pakistan)

हेही वाचा-
विराटमधील गोलंदाज मोठ्या काळानंतर झाला जागा, सहा वर्षांनंतर केली वनडेत गोलंदाजी । पाहा VIDEO
‘आमच्यावेळचा पाकिस्तान संघ वेगळा होता, आताचा…’, बाबरसेनेविषयी ‘दादा’चं रोखठोक वक्तव्य

Related Articles