भारत विरुद्ध बांगलादेश संघात वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 17वा सामना खेळला जात आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर हा सामना पार पडत आहे. या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीरांनी मोठी सलामी दिल्यानंतरही इतर फलंदाजांनी निराशा केल्यामुळे बांगलादेशचा डाव 256 धावांवर सीमित राहिला. भारतीय संघासाठी सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली.
Innings Break!
Bangladesh set a 🎯 of 2⃣5⃣7⃣ for #TeamIndia!
2⃣ wickets each for Jasprit Bumrah, Mohd. Siraj & Ravindra Jadeja.
A wicket each for Kuldeep Yadav & Shardul Thakur.
Scorecard ▶️ https://t.co/GpxgVtP2fb#CWC23 | #INDvBAN | #MenInBlue pic.twitter.com/U1PJebkXxz
— BCCI (@BCCI) October 19, 2023
कर्णधार शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय सलामीवीर लिटन दास व तंझीद हसन यांनी योग्य ठरवला. दोघांनी 93 भावांची सलामी दिल्यानंतर कुलदीप यादवने भारताला पहिले यश मिळवून दिले. हसनने 51धावा केल्या. त्यानंतर बांगलादेशच्या डावाला गळती लागली. मधल्या फळीत शांतो व मेहदी अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. लिटन दासने 66 धावांचे योगदान दिले.
अनुभवी मुशफिकूर रहीम याने 38 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाचा डाव सावरला. अखेर महमदुल्लाहने 36 चेंडूंमध्ये 46 धावा करून बांगलादेशला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले. भारतासाठी जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा व मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
(2023 ODI World Cup Bangladesh Post 256 Runs For India bumrah siraj shines)
हेही वाचा-
विराटमधील गोलंदाज मोठ्या काळानंतर झाला जागा, सहा वर्षांनंतर केली वनडेत गोलंदाजी । पाहा VIDEO
‘आमच्यावेळचा पाकिस्तान संघ वेगळा होता, आताचा…’, बाबरसेनेविषयी ‘दादा’चं रोखठोक वक्तव्य