---Advertisement---

IND vs BAN: बांगलादेशने जिंकला टॉस, टीम इंडिया विजयी ‘चौकार’ मारण्यासाठी सज्ज; पाहा Playing XI

Rohit-Sharma
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 17व्या सामन्यात भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध भिडणार आहे. हा सामना पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार 2 वाजता सुरुवात होणार आहे. यापूर्वी नाणेफेक झाली, जी बांगलादेशचा कर्णधार नजमुल होसेन शांतो याने जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला.

या सामन्यात बांगलादेश संघात मोठा बदल झाले आहेत. नियमित कर्णधार शाकिब अल हसन संघातून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याच्या जागी नजमुल होसेन शांतो संघाचे नेतृत्व करणार आहे. शाकिबच्या जागी नसूम अहमदला संघात घेतले आहे. तसेच, तस्कीन अहमद याच्या जागी हसन महमूद याला घेतले आहे. दुसरीकडे, भारतीय संघात एकही बदल झाला नाही.

आमने-सामने कामगिरी
भारत आणि बांगलादेश संघातील आमने-सामने कामगिरी पाहायची झाली, तर विश्वचषकात उभय संघ एकूण 4 वेळा आमने-सामने आले आहेत. यातील तीन सामने जिंकण्यात भारताला यश आले आहे, तर एक सामना बांगलादेशने जिंकला आहे.

स्पर्धेतील कामगिरी
भारत आणि बांगलादेश संघांची विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरी पाहायची झाली, तर भारतीय संघाने एकही सामना गमावला नाहीये. भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने, दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला 8 विकेट्सने, तर तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानला 7 विकेट्सने पराभूत केले आहे.

दुसरीकडे, बांगलादेश संघानेही पहिला सामना जिंकला होता. त्यांनी अफगाणिस्तानला 6 विकेट्सने पराभूत केले होते. मात्र, त्यानंतर पुढील दोन्ही सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यांना दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने 137 धावांनी, तर तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सने नमवले. अशात बांगलादेश आपल्या दुसऱ्या विजयाच्या प्रयत्नात असेल. (Bangladesh have won the toss and have opted to bat against india)

विश्वचषकातील 17व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

बांगलादेश-
लिटन दास, तनजीद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मेहदी हसन मिराज, तौहिद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्लाह, नसूम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम

हेही वाचा-
पंड्याकडून भारताच्या 2023 विश्वचषकातील यशाचा खुलासा; म्हणाला, ‘आम्ही ड्रेसिंग रूममध्ये सर्वांचे…’
न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव करताच केला आश्चर्यकारक Record, 1975नंतरचा दुसरा जबरदस्त विजय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---