ODI World Cup 2023क्रिकेटटॉप बातम्या

पंड्याकडून भारताच्या 2023 विश्वचषकातील यशाचा खुलासा; म्हणाला, ‘आम्ही ड्रेसिंग रूममध्ये सर्वांचे…’

विश्वचषक 2023 स्पर्धेत एकही सामना न गमावणाऱ्या संघांबद्दल बोलायचं झालं, तर त्यात भारत आणि न्यूझीलंड संघांचा समावेश आहे. न्यूझीलंडने 4 सामने खेळले असून चारही सामन्यात विजय साकारला आहे. दुसरीकडे, भारतीय संघानेही 3 सामने खेळले असून तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. यामुळे न्यूझीलंड पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या, तर भारत दुसऱ्या स्थानी आहे. अशात भारताच्या या यशामागील रहस्य काय आहे, याचा खुलासा भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या याने केला आहे.

भारताचे विजय
भारतीय संघाने विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेच्या आपल्या पहिल्या सामन्यात 5 वेळचा विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलिया संघाचा 6 विकेट्सने पराभव केला होता. यानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तान संघाला 8 विकेट्सने, तर कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाला 7 विकेट्सने पराभवाची धूळ चारली.

काय म्हणाला पंड्या?
भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने ब्रॉडकास्टर्सशी बोलताना, विश्वचषक 2023 स्पर्धेत संघाच्या यशामागील मंत्राचा खुलासा केला. त्याने सांगितले की, ड्रेसिंग रूममधील माहोल शानदार आहे आणि संपूर्ण संघ एकजूट होऊन खेळत आहे.

तो म्हणाला, “जेव्हा आम्ही ड्रेसिंग रूममध्ये संघाच्या बैठकीदरम्यान आपली प्लेइंग इलेव्हन दाखवतो, तेव्हा त्यासोबत आम्ही आमचे जुने आणि बालपणीचे फोटोही दाखवतो. ड्रेसिंग रूममधील माहोल खूप चांगला आहे. सर्वजण एकजूट होऊन खेळत आहेत.”

https://www.instagram.com/reel/CyirEBWPcQY/?utm_source=ig_embed&ig_rid=0670d1f0-63d9-4815-874a-0db90dba8201

पंड्याचे स्पर्धेतील प्रदर्शन
पंड्याच्या या विश्वचषकातील प्रदर्शनाविषयी बोलायचं झालं, तर त्याला फक्त 1 वेळा फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. त्यात त्याने 8 चेंडूत नाबाद 11 धावा केल्या होत्या. तसेच, गोलंदाजी करताना त्याने शानदार प्रदर्शन केले. त्याने 3 डावात 21च्या सरासरीने आणि 6.56च्या इकॉनॉमीने 5 विकेट्स घेतल्या आहेत. पंड्याने महत्त्वाच्या वेळी विकेट्स घेऊन भारताला यश मिळवून दिले आहे.

विजयी ‘चौकार’ लावण्याच्या प्रयत्नात भारत
भारतीय संघ गुरुवारी (दि. 19 ऑक्टोबर) आपला चौथा सामना बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये वनडे विश्वचषकात आतापर्यंत 4 सामने खेळले गेले आहेत. त्यातील 3 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे, तर एक सामना बांगलादेशने जिंकला आहे. अशात हा सामना जिंकून भारतीय संघ विजयी ‘चौकार’ मिळवण्याचा प्रयत्न करेल. (all rounder hardik pandya reveals the success mantra of india cricket team in world cup 2023)

हेही वाचा-
न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव करताच केला आश्चर्यकारक Record, 1975नंतरचा दुसरा जबरदस्त विजय
पुण्याच्या मैदानात नेहमीच चमकलाय अश्विन, पण बांगलादेशविरुद्ध मिळणार नाही संधी; माजी क्रिकेटरचे विधान

Related Articles