---Advertisement---

पुण्याच्या मैदानात नेहमीच चमकलाय अश्विन, पण बांगलादेशविरुद्ध मिळणार नाही संधी; माजी क्रिकेटरचे विधान

R-Ashwin
---Advertisement---

भारतीय संघ वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत विजयाची हॅट्रिक केल्यानंतर आता बांगलादेशविरुद्ध विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत विरुद्ध बांगलादेश संघात विश्वचषकातील 17वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर गुरुवारी (दि. 19 ऑक्टोबर) पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याच्याविषयी मोठी प्रतिक्रिया समोर येत आहे.

भारताचा माजी खेळाडू आणि सध्याचा समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने आर अश्विन (R Ashwin) याच्याविषयी मोठे विधान केले आहे. त्याने म्हटले आहे की, अश्विनला या खेळपट्टीवर प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले जाणार नाही. कारण, इथे फिरकीपटूंना तितकी मदत मिळत नाही.

‘अश्विनला संधी मिळण्याची खूपच कमी आशा’
आकाश चोप्रा याच्या मते, पुण्यात फिरकीपटूंना हवा तसा फायदा मिळत नाही. त्यामुळे अश्विनला बाहेर बसावे लागू शकते. त्याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, “भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करेल का? मला वाटत नाही की, संघ कोणताही बदल करेल. कारण, इथे अतिरिक्त फिरकीपटूला कोणतीही संधी नाहीये. तुम्ही इथे रविचंद्रन अश्विनला का खेळवाल? आयपीएलमध्ये इथे फिरकीपटूंना मदत मिळत नव्हती, तेव्हा हा तर विश्वचषक आहे. उपखंडातील संघांविरुद्ध तुम्ही अतिरिक्त फिरकीपटू का खेळवाल ना? त्यामुळे माझ्या मते, प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल होणार नाही.”

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याला चेन्नई येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात संधी देण्यात आली होती. तिथे त्याने चांगली गोलंदाजी केली होती. त्याने आपल्या 10 षटकांच्या स्पेलमध्ये 1 निर्धाव षटक टाकत 34 धावा खर्च केल्या होत्या. यादरम्यान त्याला एक विकेटही घेण्यात यश आले होते. मात्र, चेन्नईची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी फायदेशीर होती. त्यामुळे भारताने तीन फिरकीपटूंना खेळवले होते. यानंतर पुढील दोन्ही सामन्यात अश्विनला संधी मिळाली नाही. अशात पुण्यातील सामन्यात अश्विनला संधी मिळते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

अश्विनची पुण्यातील कामगिरी
तसं पाहिलं, तर पुण्यात एमसीए स्टेडिअमवर खेळताना अश्विनने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर इथे 18 आंतरराष्ट्रीय विकेट्सचा समावेश आहे. अशात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (world cup 2023 spinner ravichandran ashwin will not get chance vs bangladesh says this cricketer)

हेही वाचा-
भारतात पाकिस्तानी खेळाडूंशी होतोय वाईट व्यवहार? कर्णधारासह प्रमुख खेळाडूंनी स्वत:च सांगितलं- व्हिडिओ
न्यूझीलंडने भारताकडून हिसकावला नंबर 1, Points Tableमध्ये टीम इंडियाची घसरण, आता ‘हा’ संघ 10व्या स्थानी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---