न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात सध्या वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात यजमान न्यूझीलंडने तब्बल 198 धावांनी विजय मिळवला. श्रीलंकन फलंदाज या सामन्यात स्वस्तात बाद झाले. सोबत सामन्यादरम्यान काही अशा नाटकीय घडामोडी घडल्या, याची सर्वत्र चर्चा आहे. तांत्रिक अडचणीमुळे दोन्ही सांघांच्या फलंदाजांना मात्र फायदा झाला.
न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणारा श्रीलंकन संघ 49.3 षटकांमध्ये न्यूझीलंडला 274 धावांवर रोखू शकला. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या सर्वच्या सर्व फलंदाजांनी अवघ्या 76 धावांवर विकेट्स गमावल्या. हेन्री शिपले याने न्यूझीलंडसाठी सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करत संघाला मोठा विजय मिळवून दिला. न्यूझीलंडच्या गोलंदाजीवेळी श्रीलंकन संघाचा एक फलंदाज धावबाद झाला, पण पंचांनी त्याला नाबाद करार दिला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून बनवलेले स्टंप्स वापरले जात आहेत. पण न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात याच आधुनिक स्टंप्समुळे वातापरण तापले होते. लाईव्ह सामन्यानंतर चांगलाच ड्राम प्रेक्षकांना पाहायला मिळाला. श्रीलंकेच्या डावाती 19 व्या षटकात चमिका करुणारत्ने एक धाव घेण्यासाठी पळाला. पण न्यूझीलंडच्या खेळाडूने त्याला धावबाद केले. चेंडू स्टंप्सला लागल्यानंतर फलंदाज बाद असण्याची खात्री व्यक्त केली गेली. पण स्टंप्सच्या बेल्स हवेत उडाल्यानंतर त्यात लाईट मात्र लागली नाही. याच कारणारत्नेला पंचांनी करुणारत्ने नाबाद असल्याचे सांगितले.
https://twitter.com/ARIFPIN67248448/status/1639522379104911361?s=20
करुणारत्नेळा स्टंप्समधील तांत्रिक अडचणीमुळे जीवनदान मिळालेच. पण सामन्यातील ड्रामा एवढ्यात नव्हता. न्यूझीलंडच्या डावात देखील बेल्समुळे फलंदाजाला जीवनदान मिळाले होते. न्यूझीलंडचा फलंदाज फिल एलन क्लीन बोल्ड झाला होता. पण बेल्स खाली पडले नाहीत, ज्यामुळे फलंदाजाला नाबाद करार दिला गेला. पंचांनी या सामन्यात दिलेले निर्णय सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. चाहते आपली मते व्यक्त करत आहेत.
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला तर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसाठी रचिन रविंद्र याने 49, तर फिन एलनने सर्वाधिक 51 धावा केल्या. डार्ली मिचेल 47 धावा करून तंबूत परतला. चमिका करुणारत्ने याने श्रीलंकन संघासाठी सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात 275 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेला श्रीलंकन संघ अवघ्या 76 धावांवर सर्वबाद झाला. एंजलो मॅथ्यूज याने सर्वाधिक 18 धावा त्याच्या संघासाठी केल्या. हेन्री शिपले याने न्यूझीलंडसाठी सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. हा सामना जिंकल्यानंतर न्यूझीलंडने वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
(In the match between New Zealand and Sri Lanka, the umpires had to give not out despite the batsman being run out)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2023 । अक्षर पटेलला उपकर्णधार का बनवले? प्रशिक्षक रिकी पाँटिंगने दिले ‘हे’ उत्तर
कोणत्या संघाचा गोलंदाजी अटॅक सर्वात भारी? माजी खेळाडूने घेतले ‘या’ संघाचे नाव, म्हणाला, ‘त्यांच्याकडे…’