पुणे (28 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये रेलीगेशन फेरीतील आजचा पहिला सामना रायगड विरुद्ध नांदेड या दोन संघात झाला. रायगड संघाचा पहिला सामना बरोबरीत राहिला होता तर नांदेड संघाने पहिला सामना जिंकला होता. रायगड संघाने जोरदार सुरुवात करत सामन्यात आघाडी मिळवली. धिरज बैलमारे ने आक्रमक चढाया करत गुण मिळवत नांदेड संघाला ऑल आऊट केले. 8 मिनिटाच्या खेळानंतर 10-02 अशी आघाडी मिळवली होती.
नांदेड कडून शक्ती शेडमके व शुभम चांदमरे यांनी चतुरस्त्र चढाया करत सामन्यात रंगत आणली होती. मध्यंतराला रायगड संघाकडे 16-10 अशी आघाडी होती. रायगड संघाने मध्यंतरा नंतर आक्रमक खेळ करत सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. रायगडच्या धिरज बैलमारे ने अष्टपैलू खेळ करत महत्वपूर्ण भूमिका निभावली. रायगड संघाने उत्तराधार्थ आपली आघाडी कमी होऊ न देता कायन ठेवत सामना जिंकला.
रायगड संघाने नांदेड संघावर 33-22 असा विजय मिळवला. रायगड कडून धिरज बैलमारे ने चढाईत 9 तर पकडीत 3 गुण मिळवत विजयचात महत्वपूर्ण भूमिका निभावली. तर चढाईत त्याला अनुराग सिंग व निखिल शिर्के यांनी चांगली साथ दिली. बचवाफळीत वैभव मोरे ने 3 गुण मिळवले. नांदेड कडून शक्ती शेडमके ने अष्टपैलू खेळ करत चढाईत 9 तर पकडीत 4 गुण मिळवले. शुभम चांदमरे ने 5 गुण मिळवले. रायगड संघ या विजयासह पहिल्या क्रमांकावर पोहचला. (In the relegation round Raigad beat the team)
बेस्ट रेडर- धिरज बैलमारे, रायगड
बेस्ट डिफेंडर- शक्ती शेडमके, नांदेड
कबड्डी का कमाल – धिरज बैलमारे, रायगड
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 । विराटच्या चाहत्याला सुरक्षारक्षकांकडून प्रसाद, मैदानातून बाहेर नेल्यानंतर काय घडला पाहाच
हैदराबादपुढे सगळे सपाट! 20 षटकात 277 धावा कुटल्या आणि मोडला आरसीबीचा महाविक्रम