न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आयपीएल 2023 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. शनिवारी (8 एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आमना सामना झाला. राजस्थानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बोल्टने दुसऱ्या इनिंगमध्ये पहिल्याच षटकात दिल्लीला दोन लागोपाठ झटके दिले. तत्पूर्वी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध देखील बोल्टने अशाच प्रकारे प्रदर्शन केले होते.
शनिवारी गुवाहाटीत खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या नुकसानावर 199 धावा केल्या. प्रत्युत्तरात फलंदाजीला आल्यानंतर दिल्लीला सुरुवाचे दोन षटके ट्रेंट बोल्टने दिले. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मनीष पांडे यांनी डावातील पहिल्याच षटकात विकेट गमावली. बोल्ट दिल्लीच्या डावातील पहिले षटक टाकण्यासाठी आला होता. षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने शॉ, तर चौथ्या चेंडूवर मनीष पांडेला तंबूत धाडले. शॉने तीन चेंडू खेळळे, तर पांडे मात्र गोल्डन डक (पहिल्या चेंडूवर शून्य धावा करून बाद) झाला.
How about THAT for a start! 🤯
WHAT. A. CATCH from the #RR skipper ⚡️⚡️#DC lose Impact Player Prithvi Shaw and Manish Pandey in the first over!
Follow the match ▶️ https://t.co/FLjLINwRJC#TATAIPL | #RRvDC pic.twitter.com/rpOzCFrWdQ
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2023
बोल्डने टाकलेल्या पहिल्या षटकात दिल्लीच्या फलंदाजांनी तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर विकेट गमावल्या. आयपीएल 2023 हंगाम सुरू होऊन अवघे काहीच दिवस झाले आहेत. दरम्यानच्या काळात राजस्थानचा हा तिसराच सामना आहे. पण बोल्डने डावातील पहिल्या षटकात दोन विकेट्स घेण्याची ही हंगामातील दुसरी वेळ आहे. शनिवारी दिल्लीविरुद्ध अशी कामगिरी करण्याआधी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध देखील बोल्डने राजस्थानसाठी पहिले षटक टाकले आणि दोन विकेट्स घेतल्या होत्या.
हैदराबादविरुद्धचा हा सामना रविवारी (2 एप्रिल) झाला होत्या, ज्यामध्ये राजस्थानने 72 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात बोल्डने टाकेलल्या पहिल्या षटकात हैदराबाच्या फलंदाजांनी तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर विकेट गमावली होती. हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांना बोल्टने शून्यावर बाद केले होते. राजस्थानला मिळालेल्या विजयात बोल्डचे योगदान महत्वाचे ठरले होते. (In the second match against Delhi Capitals, Trent Bould took two wickets in the first over)
डावातील पहिल्या षटकात ट्रेंट बोल्ट
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध : 0, 0, विकेट, 0, विकेट, 0.
दिल्ली कॅपिटल्स : 0, 0, विकेट, विकेट, 0, 0.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
यापेक्षा वाईट काय असू शकतं! ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून येताच पृथ्वीने नावावर केला लाजीरवाणा विक्रम
आयपीएलचे सोळाही हंगाम खेळणारे सात शिलेदार, यादीत सगळेच भारतीय