इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसरा टी-२० सामना शनिवारी (९ जुलै) बर्मिंघमच्या एजबस्टन स्टेडियमवर खेळला गेला. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर या सामन्यात पुन्हा एकदा भुवनेश्वर कुमराचा शिकार बनला. उभय संघातील पहिल्या सामन्यातही भुवनेश्वरनेच बटलरला बाद केले होते. विशेष बाब ही आहे की, या दोन्ही सामन्यात बटलर एक आकडी धावसंख्येवर बाद झाला आहे.
भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात बटरलने स्वतःचे खातेही खोलले नव्हते आणि भुवनेश्वर कुमरा (Bhuvaneshear Kumar) त्याची विकेट घेऊन गेला. त्यानंतर उभय संघातील दुसऱ्या सामन्यात भुवनेश्वरनेच त्याची विकेट घेतली. जोस बटलर (Jos Buttler) या सामन्यात अवघे पाच चेंडू खेळू शकला आणि ४ धावा करून विकेट गमावली.
दरम्यान, टी-२० क्रिकेटमधील ही पाचवी वेळ आहे, जेव्हा बटलर भुवनेश्वरच्या चेंडूवर बाद झाला आहे. या ५ डावांमध्ये बटलर फक्त ६९ चेंडू खेळला आणि ६६ धावा केल्या. त्याची सरासरी १३.२० होती, तर स्ट्राईक रेट ९५.६५ होता. ७ चौकार आणि एका षटकारांच्या मदतीने त्याने या धावा केल्या आहेत.
दरम्यान, जोस बटलर आयपीएल २०२२ मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये होता, परंतु भुवनेश्वरपुढे त्याची जादू कधीच चालली नाही. टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजांनी बटलरला एकूण १० वेळा बाद केले आहे. त्यापैकी ५ वेळा एकट्या भुवनेश्वर कुमारने त्याची विकेट घेतली, तर राहिलेल्या पाच वेळा भारताच्या इतर वेगवान गोलंदाजांनी त्याला बाद केले.
भारताविरुद्धच्या टी-२० सामन्यात बटलर आतापर्यंत पाच वेळा एक आकडी धावसंख्येवर बाद झाला आहे. तो सर्वप्रथम २०१७ मध्ये शून्य धावांवर बाद झाला होता आणि तेव्हा जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. त्यानंतर २०२१ मध्ये दोन वेळा, तर २०२२ मध्ये दोन वेळा बटलर एकट्या भुवनेश्वरच्याच गोलंदाजीवर एक आकडी धावसंख्येवर बाद झाला आहे. या पाचही डावांमध्ये बटलरला १० धावांचा टप्पा ओलांडता आला नसून त्यातील तीन वेळा तो शून्यावर बाद झाला आहे.
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने २० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर १७० धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय आणि जोस बटलर यांनी अनुक्रमे ० आणि ४ धावांवर विकेट गमाल्यामुळे संघ अडचणीत आला. इंग्लंडने अवघ्या ५५ धावांवर ५ विकेट्स गमावल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टक्कर मारू का? फिल्डरने मार्ग अडवल्यानंतर पंतचा रोहितला प्रश्न, कर्णधारानं दिलेलं उत्तर बघाच
इंग्लंड संघाचे कसोटीही टी२० प्रमाणे खेळण्याचे गुपित उलगडले, खुद्द बेयरस्टोने सांगितलंय
मेमरीज रिलोडेड! जयसूर्याचा मैदानात दिसला आक्रमक अंदाज, ऑस्ट्रेलियन आले धोक्यात