---Advertisement---

दुसऱ्या सामन्यात भारताने गमावली नाणेफेक, टीम इंडियापुढे मालिका हातात ठेवण्याचे आव्हान

IND vs NZ t20i
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील यांच्यातील दुसरा टी-20 सामना रविवारी (29 जानेवारी) खेळला जात आहे. उबय संघांतील हा सामना लखनऊमध्ये आहे. रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या भारताचे नेतृत्व करत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 21 धावांनी पराभव स्वीकारला असून दुसऱ्या सामन्यात देखील हार्दिकने नाणेफेक गमावली. नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंडला कर्णधार मिचेल सॅटनर याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

उभय संघांतील पहिल्या सामन्यासाठी निवडलेला भारतीय संघ दुसऱ्या टी-20 सामन्याच जसाच्या तसा निवडला गेला. भारतीय संघासाठी मागच्या सामन्यात युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग महागात पडला होता. अर्शदीपने 4 षटकात 51 धावा देत एक विकेट घेतली होती. अर्शदीपने या सामन्याच्या शेवटच्या षटकात 7 नो बॉल टाकले आणि तब्बल 27 धावा खर्च केल्या. भारताच्या पराभवानतर अर्शदीपचने दिलेल्या दावांची भूमिका महत्वाची होती. दुसऱ्या वनडे सामन्यात त्याला संधी मिळणार नाही, अशी शक्यता पर्तवली जात असतानाच दुसऱ्या सामन्यात देखील त्याला संधी दिली गेली. वेगवान गोलंदाज उमरान मलिक ऐवजी फिरकीपटू युझवेंद्र चहल याला संघात सामील केले गेले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन.
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), ईश सोधी, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टेनिस एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारे खेळाडू, यादीत ‘ही’ महिला टेनिसपटू टॉपर
ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदाबरोबर नोवाक जोकोविचने केलेत ‘हे’ मोठे विक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---