भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा टी20 सामना दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर रंगला आहे. तत्पूर्वी या सामन्यात भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. भारतीय क्रिकेटच्या संघात आणखी एक स्टार खेळाडू उदयास आला आहे. या 21 वर्षीय खेळाडूने बांगलादेशविरुद्ध पदार्पण केले आणि त्याने यशस्वी जयस्वालची (Yashasvi Jaiswal) आठवण करून दिली.
भारताचा युवा स्टार खेळाडू नितीश कुमार रेड्डीने (Nitish Kumar Reddy) दुसऱ्या टी20 सामन्यात आपल्या खेळीने खळबळ उडवून दिली आहे. संजू सॅमसन (Sanju Samson), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि अभिषेक शर्मासारखे (Abhishek Sharma) विस्फोटक फलंदाज बाद झाले असताना नितीश कुमारने धमाकेदार फलंदाजीचे प्रदर्शन केले.
बांगलादेशविरूद्ध भारताची टॉप ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप ठरली होती. त्यावेळी नितीश कुमार रेड्डीने (Nitish Kumar Reddy) अवघ्या 34 चेंडूत 74 धावांची शानदार खेळी खेळली. दरम्यान त्याने 4 चौकार आणि 7 षटकार ठोकले. दुसरीकडे रिंकू सिंहने (Rinku Singh) फलंदाजीने कहर केला.
भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. या सामन्यात संजू सॅमसन (Sanju Samson) पुन्हा एकदा सलामीवीर म्हणून फ्लॉप असल्याचे दिसून आले. त्यानंतर युवा नितीश कुमार रेड्डीने (Nitish Kumar Reddy) धमाकेदार फलंदाजी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN; दुसऱ्या टी20 सामन्यात संजू सॅमसन फ्लाॅप! सोशल मीडियावर चाहत्यांचा हल्लाबोल
पाकिस्तानात होणार नाही चॅम्पियन्स ट्रॉफी? आयसीसीचा नवा प्लॅन जाणून घ्या
टीम इंडियाबाहेर असलेल्या इशान किशनचं नशीब जोरात, या संघाचं कर्णधारपद मिळालं