---Advertisement---

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी जिंकली डी वाय पाटीलची खेळपट्टी, टी-20 मालिकेतील पाहुण्यांचा पहिला विजय

On: रविवार, जानेवारी 7, 2024 11:12 PM
Kim Garth Australia Womens Team
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघातील दुसरा टी-20 सामना ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स राखून जिंकला. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर किम गार्थ सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. भारताविरुद्धची वनडे मालिका स्लीन स्वीपने जिंकल्यानंतर टी-20 मालिकेतील पहिला विजय ऑस्ट्रेलियाने मिळवला.

उभय संघांतील या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 8 विकेट्सच्या नुकसानावर 130 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 19 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या नुकसानावर सामना जिंकला. सामनावीर ठरलेल्या किम गार्थ हिने 4 षटकांमध्ये 27 धावा खर्च करून दोन विकेट्स घेतल्या. शफाली वर्मा जेमिमाह रॉड्रिग्ज या प्रमुख फलंदाजांच्या विकेट्स गार्थने घेतल्या. भारतासाठी हे सुरुवातीचे दोन झटके मोठे नुकसान करणारे ठरले.

प्रथम फलंदाजी करताना भारतासाठी दीप्ती शर्मा हिने सर्वाधिक 30 धावांची खेळी केली. सलामी फलंदाज स्मृती मंधाना हिने 26 चेंडूत 23 धावांची खेळी केली. शफाली वर्मा मात्र अवघी एक धाव करून बाद झाला. जेमिमाह रॉड्रिग्ज हिने 13, हरमनप्रीत कौर 6, तर रिचा घोष 23 धावा करून बाद झाल्या. पूजा वस्त्राकर आणि अमनजोत कौर यांनी अनुक्रमे 9 आणि 4 धावा करून विकेट्स गमावल्या. श्रेयांका पाटील 7 धावा करून नाबाद राहिली. ऑस्ट्रेलियासाठी किम गार्थ हिच्यासोबत एनाबेल सदरलँड आणि जॉर्जिया वेअरहम यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. ऍशले गार्डनर हिला एक विकेट मिळाली.

फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियासाठी एलिस पेरी (Ellyse Perry) हिने 21 चेंडूत सर्वाधिक 34* धावा केल्या. फिबी लिचफील्ड 18 धावांवर नाबाद राहिली. सलामी फलंदाज आणि कर्णधार एलिसा हिली 26, बेथ मुनी 20 आणि ताहलिया मॅकग्रा 19 दावा करून बाद झाल्या. ऍशले गार्डनर हिनेही 7 धावावर विकेट गमावली. भारतासाठी दीप्ती शर्मा गोलंदाजीही सर्वोत्तम केली. तियने टाकलेल्या 4 षटकात 22 धावा खर्च करून सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. श्रेयांका पाटील आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (In the second T20 match, the Australian women’s team beat India by 6 wickets)

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन – 
भारत: स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, पूजा वस्त्राकर, तितास साधू, रेणुका सिंग.

ऑस्ट्रेलिया: ऍलिसा हिली (कर्णधार, यष्टीरक्षक), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ग्रेस हॅरिस, एनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहम, मेगन शट, किम गर्थ

बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या – 

पोलार्डच्या नाराजीचे कारण समजले, मुंबई फ्रँचायझीमुळेच ठेवली ‘ती’ इंस्टाग्राम स्टोरी
‘यासाठी टी20 क्रिकेट जबाबदार’, केपटाऊन कसोटी दीड दिवसात संपल्यानंतर डिविलियर्सचे मोठे विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---