भारतीय संघ सध्या मायदेशात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पाहुण्या इंग्लंड संघाने पहिल्याच कसोटी सामन्यात भारताचा 28 धावांनी पराभूत केले. अशात दुसरा कसोटी सामना जिंकणे यजमान भारतासाठी महत्वाचे झाले आहे. भारतीय खेळपट्टी नेहमीच फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल राहिली आहे. अशात दोन्ही संघ आपल्या सर्वोत्तम फिरकीपटूंना कसोटी मालिकेत खेळपत आहेत. भारताचा महान फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आगामी कसोटी सामन्यात मोठा विक्रम नावावर करू शकतो.
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील हा दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (2 फेब्रुवारी) विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियमवर सुरू होईल. या सामन्यात रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) कारकिर्दीतील मैलाचा दगड पार करू शकतो. तत्पूर्वी मालिकेतील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात अश्विनने दोन्ही डावात प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या होत्या. पण विशाखापट्टणम कसोटीत अश्विनला दुसऱ्या बाजूने रविंद्र जडेजा याची साथ निसेल. जडेजाने दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात अश्विनवर विकेट्स घेण्याचा दबाव वाढला आहे. पण तो या सामन्यात इंग्लंडविरुद्ध आपल्या 100 विकेट्स देखील पूर्ण करू शकतो.
इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनणार
रविचंद्रन अश्विन भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनणार आहे. हा विक्रम करण्यासाठी त्याला अजून फक्त दोन विकेट्सची गरज आहे. भारताचे माजी लेग स्पिनर भागवत चंद्रशेखर या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी इंग्लंडविरुद्ध 23 कसोटी सामन्यांमध्ये 95 विकेट्स घेतल्या होत्या. अश्विन सध्या या यादीत 20 सामन्यांमध्ये 94 विकेट्स घेत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
इंग्लंडविरुद्ध 100 कसोटी विकेट्सचा टप्पा ओलांडणार
विशाखापट्टणममध्ये अश्विनने जर 6 विकेट्स घेतल्या, तर फिरकीपटू कसोटी क्रिकेटमधील 100 विकेट्सचा टप्पा पार करेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये 100 विकेट्स घेणारा अश्विन पहिला भारतीय गोलंदाज बनू शकतो. याआदी इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने भारताविरुद्ध 100 कसोटी विकेट्सचा टप्पा पार केला होता. अँडरसनच्या नावावर सध्या 35 सामन्यांमध्ये 139 धावा केल्या आहेत.
पूर्ण करणा 500 कसोटी विकेट्सचा आकडा
रविचंद्रन अश्विन शुक्रवारी सुरू होणाऱ्या सामन्यात अजून एक मोठा विक्रम नावावर करू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये मागच्या मोठ्या काळापासून अश्विन विकेट्स घेत आला आहे. वायझॅक स्टेडियमवर त्याने अजून 4 विकेट्स घेतल्या, तर आपल्या 500 कसोटी विकेट्स देखील तो पूर्ण करेल. त्याने पुढच्याच याच सामन्यात ही कामगिरी केली, तर अश्विन सर्वात कमी सामन्यांमद्ये 500 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनले. अश्विनसाठी हा कारकिर्दीतील 97वा कसोटी सामना आहे.
याआधी अनिल कुंबळे यांनी 105 कसोटी सामन्यांमध्ये 500 कसोटी विकेट्स पूर्ण केल्या होत्या. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मुरलीधरनने अवघ्या 87 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. (In the second Test match against England, Ravichandran Ashwin can make a big record)
महत्वाच्या बातम्या –
रोहितनं ठरवलंतर पराभव अशक्य! हैरदाबाद कसोटीतील पराभवानंतरही माजी दिग्गजाने केलं रोहितचं कौतुक
वाढदिवस विशेष: एक हात मोडला असताना ग्रॅमी स्मिथ आला मैदानात, पुढे काय झाले पाहाच!