---Advertisement---

विराट कोहलीसाठी ‘हा’ गोलंदाज ठरणार डोकेदुखी, भुवनेश्वर आणि सूर्यकुमारच्या प्रदर्शनावरही असेल लक्ष

On: बुधवार, नोव्हेंबर 9, 2022 6:51 PM
team india
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी (10 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषक 2022 चा उपांत्य सामना खेळला जाणार आहे. उभय संघांतील ही लढत एडिलेड ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून अंतिम सामन्यात पोहोचण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असेल. टी-20 विश्वचषक स्पर्धेत 2012 नंतर म्हणजेच तब्बल 10 वर्षांनंतर हे संघ आमने सामने असतील. मागच्या वेळी जेव्हा हे संघ टी-20 विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले होते, तेव्हा भारताने बाजी मारली होती. यावेळी कोणता संघ बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे असेल. आपण या लेखात काही खेळाडूंचा विचार करणार आहोत, जे सामन्याचा निकालावर प्रभाव टाकतील. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील या सामन्यात काही खेळाडूंमधील आमना सामना पाहण्यासारखा असेल. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) यावर्षीच्या टी-20 विश्वचषकात अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये. अशात भारताविरुद्ध उपांत्य सामन्यात देखील गोलंदाज त्याची परिक्षा पाहतील. दुसरीकडे भुवनेश्वर कुमार (Bhuvneshear Kumar) यावर्षीच्या विश्वचषकात संघासाठी किफायतशीर गोलंदाजी करताना दिसला आहे. जोस बटलरविरुद्धही त्याची आकडेवारी जबरदस्त राहिली आहे. बटलर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा जर कोणत्या गोलंदाजापुढे बाद झाला असेल, तर तो भुवनेश्वर कुमार आहे.

भुवनेश्वरसमोर बटलरची बॅट शांत – 
जोस बटलर टी-20 क्रिकेटमध्ये भुवनेश्वरविरुद्ध चांगले प्रदर्शन करू शकला नाहीये. त्याने या फॉरमॅटमध्ये भुवनेश्वरचे 32 चेंडू खेळले आणि 30 धावा केल्या आहे. यादरम्यान तो पाच वेळा भुवनेश्वरच्या चेंडूवर बाद झाला. विशेष म्हणजे भुवनेश्वने प्रत्येक वेळी पहिल्या तीन षटकात त्याला बाद केले आणि बहुतांश वेळा बटलर स्विंग होणाऱ्या चेंडूवर बाद झाल्याचेही दिसले. असे असले तरी चालू विश्वचषकात बटलर पावरप्लेमध्ये संयमी खेळ करताना दिसला आहे. पहिल्या तीन षटकांमध्ये त्याचा स्ट्रईक रेट 93चा राहिला आहे, एकंदरीत पावरप्लेचा विचार केला, तर त्याचा स्ट्राईक रेट 108चा आहे. चाहत्यांना नक्कीच त्याच्याकडून यापेक्षा चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे.

हेल्स-बटलर सलामीवीर जोडीकडून इंग्लंडला अपेक्षा – 
इंग्लंड संघासाठी एक जमेची बाजू म्हणज त्यांचे सलामीवीर जोस बटलर आणि एलेक्स हेल्स सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यांनी मागच्या दोन सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन करत अर्धशतकीय भागीदारीही केली. हेल्स आणि बटलरने श्रीलंकन संघाविरुद्ध खेळताना पहिल्या विकेटसाठी 75 धावा केल्या, तर न्यूझीलंडविरुद्ध खेळताना या या दोघांनी 81 धावांची भागीदारी केली. अशात भारताविरुद्ध उपांत्य सामन्यात त्यांच्या सलामीवीर जोडीत बदल होण्याची कुठलीच शक्यता दिसत नाही. असे असले तरी, भुवनेश्वरसमोर बटलरचे अपयश पाहता संघ यावर विचार करू शकतो. हेल्सने संघात पुनरागमन केल्यानंतर बटलर सलामीला येताना स्ट्राईकवर येत आहे. पण भारताविरुद्ध तो नॉन स्ट्राईकला येऊ शकतो, जेणेकरून त्याला भुवनेश्वरच्या चेंडूंचा कमीत कमी सामना करावा लागेल.

मार्क वुडच्या गतीमुळे सूर्यकुमार अडचणीत येणार? – 
टी-20 विश्वचषकाच्या चालू हंगामात एका फलंदाजाची सर्वाधिक चर्चा होत आहे, तो म्हणजे सूर्यकुमार यादव. सूर्यकुमारने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत जबरदस्त प्रदर्शन केले आहे आणि इंग्लंडविरुद्ध देखील चाहत्यांच्या च्याकडून अशाच प्रदर्शनाची अपेक्षा आहे. सूर्यकुमार विश्वचषक सुरू झाल्यापासून अधिकच आक्रमतेने फलंदाजी करताना दिसत आहे. सूर्या पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात करतो. फलंदाजी करताना पहिल्या 10 चेंडूंमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 174 चा राहिला आहे. अशात इंग्लंड सूर्यकुमारला बाद करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेल.

सूर्यकुमारने इंग्लंडविरुद्धच मागच्या वर्षी टी-20 पदार्पण केले होते. त्याने इंग्लंडच्या अनेक गोलंदाजांविरुद्ध द्विपक्षीय मालिकांमध्ये चांगली फलंदाजी केल्याचे पाहिले गेले आहे. पण त्यांच्याकडे दोन असे गोलंदाज आहेत, जे सूर्यकुमारला स्वस्तात तंबूत पाठवू शकतात. यापैकी एक म्हणजे सॅम करन. या वेगवान गोलंदाजने सूर्यकुमारला टी-20 क्रिकेटमध्ये टालेल्या 8 चेंडूमध्ये दोन वेळा बाद केले आहे. दोन्ही वेळा त्याने संथ गतीने टाकला होता आणि सूर्यकुमारने त्यावर विकेट गमावली होती. यावेळी त्याची ही कमाल चालते की नाही, हे गुरुवारी समजू शकेल. दुसरा गोलंदाज आहे मार्क वूड (Mark Wood), ज्याच्या 7 चेंडूवर सूर्याने अवघ्या 6 धावा केल्या आहेत. त्याने वूडच्या जास्त चेंडूंचा सामना केला नसला, तरी एडिलेड ओव्हलवर त्या या गोलंदाजाविरुद्ध खेळताना अडचणी येऊ शकतात.

एडिलेडमध्ये विराटचे आव्हान सर्वात मोठे –
विराट कोहली याच्यासाठी एडिलेड ओव्हल मैदानात नेहमीच खास राहिले आहे. त्याने या मैदानात 14 डावांमध्ये 5 शतक आणि 3 अर्धशतके कुटली आहेत. भारताच्या बाहेर खेळताना विराटचे हे आवडते स्टेडियम राहिले आहे. यावर्षीच्या टी-20 विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध खेळताना देखील त्याने याच मैदानात अर्धशतक केले. विराट टी-20 विश्वचषकादरम्यान फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना सावध भूमिका घेत आहे. वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याचा स्ट्राइक रेट 151 राहिला आहे. तर फिरकी गोलंदाजांविरुद्ध अवघ्या 113 च्या स्ट्राईक रेटने त्याने धावा केल्या आहेत. अशात एडिलेड ओव्हवर विराटला रोखण्यासाठी आदील रशीदला महत्वाची भूमिका पार पडावी लागणार यात शंका नाही. त्याने यापूर्वी विराटसमोर अडचणी उभ्या केल्या आहेत. विराट टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्यविरुद्ध खेळताना 59 चेंडूत 63 धावा करू शकला आहे आणि दोन वेळा विकेट देखील गमावली आहे. (In the semi-final between India and England, the focus will be on the performance of these players)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्रर्र! पंचांनी एकाच फलंदाजाला 2 चेंडूंवर दोन वेळा दिले आऊट, पण असं घडलं तरी कसं?
VIDEO: खुद्द आयसीसीने केले शादाब खानच्या ‘थ्रो’चे कौतुक! एकदा पाहाच पाकिस्तानची विलक्षण फिल्डींग  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---