---Advertisement---

तिसऱ्या टी20 सामन्यात अर्धशतकवीर ठरली कर्णधार Alyssa Healy, परभवासह भारातने मालिकाही गमावली

Alyssa Healy Beth Mooney
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघासाठी भारत दौरा अप्रतिम ठरला. मंगळवारी (9 जानेवारी) ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धची टी-20 मालिका 1-2 अशा अंतराने जिंकली. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी ऑस्ट्रेलियाने 7 विकेट्स राखून जिंकला आणि मालिका देखील नावावर केली. एनाबेल सदरलँड हिने मंगळवारी डी वाय पाटील स्टेडियमवर भेगद गोलंदाजी केली, ज्यासाठी तिला सामनावीर पुरस्कार देखील मिळाला.

उभय संघांतील या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना यजमान भारताने 20 षटकांमध्ये 6 विकेट्सच्या नुकसानावर 147 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य 3 विकेट्सच्या नुकसानावर आणि 18.4 षटकांमध्ये विजय मिळवला.

भारतासाठी या सामन्यात सलामीवीर शफाली वर्मा हिने 26, तर स्मृती मंधाना हिने 29 धावांची खेळी केली. पहिल्या विकेटसाठी दोघींनी 39 धावांची भागीदारी केली आणि संघाला एक चांगली सुरुवात देखील दिली. असे असले तरी, तिसऱ्या क्रमांकावर जेमिमाह रॉड्रिग्ज आणि चौथ्या क्रमांकावर खेळणारी हमनप्रीत कौर स्वस्तात बाद झाल्या. कर्णधार हमनप्रीतने 3, तर जेमिमाहने 2 धावांवर विकेट्स गमावल्या. यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोष हिने सर्वाधिक 34 धावांची खेळी केली. दीप्ती शर्मा 14, अमनजोत कौर 17 आणि जूपा वस्त्राकर 7 धावा करून बाद झाल्या.

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाची सलामीवीर एलिसा हिली आणि बेथ मुनी या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. हिलने 55, तर मुनीने 52* धावांचे योगदान संघाच्या विजयात दिले. ताहलिया मॅकग्रा हिने 20 धावा केल्या, तर एलिस पेरी शुन्यावर बाद झाली. फिबी लिचफिल्ड 17 धावा करून शेवटपर्यंत नाबाद राहिली.

ऑस्ट्रेलियासाठी हा वनडे मालिकेतील दुसरा विजय होता. याआधी उभय संघांतील दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स राखून जिंकला होता. तर मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 9 विकेटनेस विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिली मालिकावीर पुरस्काराची मानकरी ठरली.  (In the third T20 match, Australia won the match and clinched the series)

महत्वाच्या बातम्या – 
Mumbai Cricketer Dies: मुंबईच्या दिग्गज क्रिकेटरचा बॉल लागून मृत्यू, मैदानावरच घेतला अखेरचा श्वास
कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, वॉर्नरच्या जागी संघाला मिळाला अनुभवी सलामीवीर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---