---Advertisement---

आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय, घरात घुसून इंडिजवर गाजवले वर्चस्व

On: रविवार, ऑगस्ट 18, 2024 10:19 AM
SA vs WI
---Advertisement---

वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका (WI vs RSA) यांच्यात खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं 40 धावांनी विजय मिळवला. या विजयासह आफ्रिकेनं मालिका जिंकली. मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता, तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं पुनरागमन करत इंडिजवर शानदार विजय मिळवला.

तत्पूर्वी गुयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर हा सामना रंगला होता. या सामन्यात आधी दक्षिण आफ्रिका आणि नंतर वेस्ट इंडिजचा संघ कमजोर दिसला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 160 धावांत गारद झाला. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजचा डाव 144 धावांवर आटोपला. दोन्ही संघांच्या पहिल्या डावात गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. त्यानंतर दुसऱ्या डावात आफ्रिकेचा संघ 246 धावांत सर्वबाद झाला आणि वेस्ट इंडिजला विजयासाठी 263 धावांचे लक्ष्य दिले.

263 धावांचे लक्ष्य ठेवून मैदानात उतरलेला वेस्ट इंडिज संघ 222 धावांवरती सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात इंडिजसाठी गुडाकेश मोतीनं सर्वाधिक (45) धावसंख्या केली. इंडिजसाठी दुसऱ्या डावात एकही फलंदाज अर्धशतक देखील झळकावू शकला नाही. यष्टीरक्षक जोशुआ डी सिल्वा (27), कावीम होडगे (29), कर्णधार क्रेग ब्रॅथवेटनं (25) धावांची खेळी खेळली. या फलंदाजांच्या खेळीमुळे वेस्ट इंडिज संघ 222 धावा करु शकला.

दक्षिण आफ्रिकेसाठी 263 धावांचे आव्हान रोखताना आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडानं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर फिरकीपटू केशव महाराजनं देखील 3 विकेट्स त्याच्या नावावर केल्या. विआन मुल्डर, डाने पेड्ट यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेत आफ्रिकेला 40 धावांनी शानदार विजय मिळवला. आफ्रिकेनं 1-0 ने ही मालिका त्यांच्या नावावर करत यजमान संघाचा घरात घुसून पराभव केला. या सामन्यांतर आता दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे.

ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्रा ही स्पर्धा गाजवणार, पाहा कधी होणार सामने
नीरज चोप्रा 90 मीटरचा टप्पा कधी ओलांडणार? गोल्डन बॉय स्वतः म्हणाला…
किंग कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 वर्षे पूर्ण! पाहा ‘विराट’ कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---