---Advertisement---

वुमन्स प्रीमियर लीग मध्ये चाहत्यांना पडणार ध्वनिची भुरळ!

On: रविवार, फेब्रुवारी 16, 2025 5:24 PM
---Advertisement---

सोमवारी होणाऱ्या वुमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या मालिकेमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ समोरासमोर असतील.दोन्ही संघांनी जिंकतंच मालिकेची सुरुवात केली आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात जायंट्सला हरविले तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवरती हरमनप्रीत कोरच्या अग्रेसर मुंबई इंडियन्सला हरवले.पुढे देखील दोन्हीही संघ याच जोशाने मैदानात उतरतील.याचबरोबर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्यापूर्वी चाहत्यांना बॉलीवुडमधील अभिनेत्री आणि गायिका ध्वनि भानुशालीचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.

वुमन्स प्रीमियर लीगच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वरून असे सांगण्यात आले आहे की, सोमवारी वुमन्स प्रीमियर लीगमध्ये बॉलीवूड मधील अभिनेत्री आणि गायिका ध्वनि भानुशाली तिचा कार्यक्रम सादर करणार आहे.वडोदराच्या कोटांबी स्टेडियममध्ये ध्वनि भानुशाली आपल्या गायनाने चाहत्यांना वेड लावणार आहे. याआधी बॉलिवूड अभिनेता आणि गायक आयुष्मान खुराणाने ओपनिंग सेरेमनी मध्ये हजेरी लावत प्रेक्षकांना भुरळ पाडली होती.

महत्वाच्या बातम्या:

‘या’ 3 संघांच्या हाती अजूनही नाही, चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद!

“वनडे वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये पोहोचले होते हे संघ, चॅम्पियन्स ट्रॉफीत काय करणार कमाल?”

क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी! आयपीएल 2025चे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---