---Advertisement---

“वनडे वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये पोहोचले होते हे संघ, चॅम्पियन्स ट्रॉफीत काय करणार कमाल?”

On: रविवार, फेब्रुवारी 16, 2025 4:21 PM
---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफी साठी निवडलेले टॉप-4 संघ आहेत तरी कोणते?भारतीय संघाला सेमीफायनल मध्ये खेळण्याची संधी भेटेल का? चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या टॉप-4 संघांबद्दल दिग्गज खेळाडू वारंवार आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.वनडे वर्ल्ड कप 2023 च्या टॉप-4 संघात भारता व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया,दक्षिण आफ्रिका आणि न्युझीलंड यांनी स्थान मिळविली होती, परंतु चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी या चार संघांचा दावा किती मजबूत आहे? वनडे वर्ल्ड कपचे टॉप-4 संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनल मध्ये पोहोचू शकतील का? त्या चार संघांबद्दल थोडं जणू घेऊयात.

दक्षिण अफ्रीका दक्षिण अफ्रीकेच्या वनडे फॉरमॅटचे प्रदर्शन विलक्षणीय ठरले आहे. दक्षिण आफ्रिकी फलंदाजांसोबतच गोलंदाज देखील कमाल खेळी खेळत आहेत.आकडेच सांगतात की आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात साऊथ आफ्रिका संघ नेहमीच मजबूत राहिला आहे,परंतु शेवटच्या क्षणी डगमगायला सुरुवात होते.मागील टी20 वर्ल्ड कप 2024 च्या टप्प्यात भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ जिंकता जिंकता राहिला होता. पाकिस्तान आणि न्युझीलँड विरुद्ध तिरंगी मालिकेमध्ये दक्षिण आफ्रिका संघ फायनल मध्ये जागा मिळवू शकला नाही.

न्युझीलँड न्यूझीलंड संघाने तिरंगी मालिकेत पाकिस्तानला हरवून तिरंगी मालिकेची उपाधी आपल्या नावावर करून घेतली आहे.न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिचेल सॅंटनर आहे.आकडे सांगतात की आयसीसी स्पर्धेत न्युझीलँड संघाला हरविणे अशक्य आहे.न्युझीलँड संघाने वनडे वर्ल्ड कप 2023 च्या सेमी फायनल मध्ये स्थान मिळवले होते,परंतु भारताविरुद्ध त्यांना हार पत्करावी लागली होती.

ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने काही कारणांमुळे आपले नाव मागे घेतले आहे. ऑस्ट्रेलिया संघातील इतर गोलंदाज त्याची बरोबरी करू शकतील का? असा प्रश्न उभा राहिला आहे. आत्ता जरी हे कोडे उपस्थित राहिले असले तरी हे विसरता येणार नाही की वनडे वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम टप्प्यात ऑस्ट्रेलिया समोर भारताला हार पत्करावी लागली.

भारत रोहित शर्मा कर्णधार असलेल्या भारतीय संघातील फलंदाजांसोबतच गोलंदाज सुद्धा उत्तम खेळताना दिसत आहेत.3 वनडे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने इंग्लंडला फार वाईट पद्धतीने हरविले आहे.या मालिकेत भारतीय फलंदाजांऐवजी गोलंदाजांनी उत्तम प्रदर्शन केले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी! आयपीएल 2025चे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

“राशिद खानचा खेळ वसीम अक्रमच्या हद्दीला ओलांडतो, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची मोठी दखल.”

इंग्लंडसाठी आनंदाची बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ओपनर फिट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---