राशीद खान हा वसीम अक्रम पेक्षा अधिक महान खेळाडू आहे,असे विधान पाकिस्तानचे माजी कर्णधार राशिद लतीफ यांनी केले आहे.राशिद लतीफ यांचे असे म्हणणे आहे की,राशिद खानने जगाच्या नकाशावर अफगाणिस्तानचे नाव झळकविण्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे.
पाकिस्तानसाठी तब्बल 200 अंतरराष्ट्रीय सामने खेळणारे राशीद लतीफ यांनी अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू राशीद खान व पाकिस्तानचा महान गोलंदाज वसीम अक्रम यांची बरोबरी करत फार मोठे विधान केले आहे. ते म्हणतात की, मी हे बोलणे योग्य नाही, परंतु राशीद खान हा वसीम अक्रम पेक्षा महान खेळाडू आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वीच या विधानामुळे चर्चांना उधान आले आहे.
माजी कर्णधार राशीद लतीफ यांनी हसना मना है या टॉक शो मध्ये क्रिकेटबद्दल बोलताना असे म्हटले आहे की, “जगाच्या नकाशावरती अफगाणिस्तानचे नाव कोरण्यात राशिद खान याचा मोलाचा मोलाचा वाटा आहे.तो वसीम अक्रम पेक्षा उत्तम खेळाडू आहे. राशिद खानची प्रतिष्ठा वसीम अक्रम पेक्षा जास्त आहे.”पाकिस्तानसाठी 37 कसोटी सामने तर 166 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या 56 वर्षीय खेळाडूचे असे म्हणणे आहे की, राशीदला आता अफगाणिस्तानच्या कसोटी संघात सुधारणा करायला हवी.
ते पुढे म्हणाले, “राशिद खानसाठी माझा एकच सल्ला आहे, त्याने आपल्या कसोटी संघामध्ये सुधारणा करावी व पाकिस्तान विरुद्ध अनेक कसोटी सामने खेळावेत.”अफगाणिस्तानचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीची आपली मोहीम कराची येथे दक्षिण आफ्रिके विरुद्ध (21 फेब्रुवारी) रोजी सुरू करणार आहे. त्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामने होतील. वर्ल्ड कप 2023 आणि टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये अफगाणिस्तानने चांगली खेळी करून कितीतरी महान संघांना तरसविले होते. यावेळी देखील या संघाकडून हीच अपेक्षा ठेवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी विशेष व्यवस्था, आयसीसीची मोठी घोषणा
इंग्लंडसाठी आनंदाची बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ओपनर फिट
अल्लाह गझनफर बाहेर, ‘हा’ अनुभवी फिरकीपटू मुंबईच्या ताफ्यात दाखल, MI चा मोठा निर्णय!






