भारतीय संघ यावर्षी होत असलेल्या वनडे विश्वचषकात यजमानपद भूषवत आहे. आपला पुढचा सामना भारताला गुरुवारी (2 नोव्हेंबर) श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे. तत्पूर्वी बुधवारी (1 नोव्हेंबर) मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयने माजी दिग्गज सचिन तेंडुलकर याच्या सन्मानार्थ मोठा काम मार्गी लावले. वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर मास्टर ब्लास्टर सचिनचा मोठा पुतळा उभारण्यात आला असून बुधवारी त्याचे उद्घाटन पार पडले.
Sachin…Sachin… The Statue is inaugurated at Wankhede @sachin_rt @100MasterBlastr pic.twitter.com/Q8E46miSC0
— Sachin Tendulkar Fan Club (@OmgSachin) November 1, 2023
https://www.instagram.com/p/CzGz9gwPc8y/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्टेडियमच्या स्टॅन्डमध्ये सचिनच्या या भव्य पुतळ्यासाठी जागा शोधली आणि त्याठिकाणी हा पुतळा उभा केला. स्वतः सचिन तेंडुलकर आपल्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी उपस्थित होता. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र एकनाथ शिंदे, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, बीसीसीआय सचिव जय शहा, माजी केंद्रिय मंत्री आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार आणि एमसीएचे प्रमुख अमोल काळे यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते. सचिनची पत्नी अंजली आणि मुलगी सारा यादेखील उद्घाटनावेळी स्टेडियममध्ये उफस्थित होत्या. बुधवारी हे उद्घाटन पार पडल्यानंतर गुरुवारी लाईव्ह सामन्यात सचिनचा हा पुतळा संपूर्ण जगाला लाईव्ह सामन्यात दिसणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना दुपरी 2 वाजता सुरू होईल.
Sachin Tendulkar statue at Wankhede Stadium.. ????????????????
On the occasions of 50 th birthday..@sachin_rt @100MasterBlastr pic.twitter.com/KJlhpggBN6— ꜱʜɪᴩʀᴀ ɢʜᴏꜱʜ (@ShipraGhosh26) November 1, 2023
भारतीय संघासाठी हा विश्वचषक हंगामातील सातवा सामना असेल. संघाने पहिल्या सहा पैकी एकही सामना गमावला नाहीये आणि गुणतालिकेत पहिल्या क्रमांक राखला आहे. उपांत्य फेरीतील भारताचे स्थान जवळपास पक्के मानले जात आहे. पण दुसरीकडे श्रीलंकन संघासाठी उपांत्य फेरीत जागा मिळवणे कठीण आहे. श्रीलंकेने आतापर्यंत खेळलेल्या साहा सामन्यांपैकी फक्त दोन सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत सध्या त्यांचा संघ सातव्या क्रमांकावर आहे. (Inauguration of Sachin Tendulkar statue at Wankhede Stadium)
महत्वाच्या बातम्या –
डी कॉकनंतर ड्यूसेनने दाखवला दर्जा! ‘इतक्या’ चेंडूत ठोकली विश्वचषक हंगामातील दुसरं शतक
तूच रे वाघा! डी कॉकने झळकावलं वर्ल्डकप 2023चं चौथं शतक, षटकार मारून घडवला इतिहास