अद्याप अधिकृतरित्या आयसीसीची मान्यता नसली तरीही, मागील सहा वर्षांपासून खेळला जाणारा टी10 हा क्रिकेटचा सर्वात लहान प्रकार हळूहळू लोकप्रिय होत आहे. अबुधाबी येथे 23 नोव्हेंबरपासून अबुधाबी टी10 लीग चे सहावे पर्व सुरू होईल. आखाती देशांमध्ये कमालीची लोकप्रियता असलेल्या या स्पर्धेत यंदा पाच भारतीय खेळाडू खेळताना दिसतील. विशेष म्हणजे यातील तीन खेळाडू भारतीय संघासाठी विश्वविजेते राहिले आहेत.
अबुधाबी येथील शेख झायद क्रिकेट स्टेडियमवर सुरू होत असलेल्या या प्रत्येकी दहा षटकांच्या सामन्यांच्या क्रिकेट स्पर्धेत यावेळी 8 संघ सहभागी होतील. या स्पर्धेत सहभागी होण्याची भारतीय खेळाडूंना थेट परवानगी नाही. इतर देशात लीग क्रिकेट खेळायचे असल्यास भारतीय खेळाडूंना निवृत्त व्हावे लागते. नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले काही भारतीय खेळाडू यावेळी या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत.
या स्पर्धेचा गतविजेता असलेला डेक्कन ग्लॅडिएटर्स हा संघ भारताचा माजी फलंदाज सुरेश रैना याची सेवा घेईल. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या रैनाने काही महिन्यांपूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारताच्या टी20 व वनडे विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य राहिलेले फिरकीपटू हरभजन सिंग व वेगवान गोलंदाज श्रीसंत हे अनुक्रमे दिल्ली बुल्स व बंगाल टायगर्स या संघांचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेत प्रथमच सहभागी होत असलेल्य न्यूयॉर्क स्ट्रायकर्सने भारताचा माजी अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नी याला आपल्या संघात समाविष्ट करून घेतला आहे. तर, वेगवान गोलंदाज अभिमन्यू मिथुन नॉदर्न वॉरियर्स या संघासाठी खेळताना दिसेल.
जवळपास दोन आठवडे चालणाऱ्या या स्पर्धेतील सर्व सामने अबुधाबी येथेच खेळवले जाते. स्पर्धेचा अंतिम सामना 3 डिसेंबर रोजी होणार आहे.
(including harbhajan and raina these five indians playing in t10)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो सर्वत्र आहे’, धोनीबद्दल विराट कोहलीने केलेल्या पोस्टने इंटरनेटवर एकच खळबळ; एकदा पाहाच
रोहित शर्माच्या 264 धावांही कमी पडल्या, जेव्हा नारायण जगदीसनने केली ‘एवढ्या’ धावांची विक्रमी खेळी