Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय खेळाडू नेपियरमध्ये दाखल, निसर्ग पाहून म्हणत असतील, ‘काय ती झाडी, काय तो डोंगर’

भारतीय खेळाडू नेपियरमध्ये दाखल, निसर्ग पाहून म्हणत असतील, 'काय ती झाडी, काय तो डोंगर'

November 21, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
team India In New Zealand

Photo Courtesy: Twitter/BCCI/Screengrabs


भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवार, 22 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. तत्पूर्वी संघ सोमवारी (21 नोव्हेंबर) नेपियरमध्ये दाखल झाला आहे. ज्याठिकाणी मालिकेतील शेवटचा टी-20 सामना खेळला जाणार आहे. संघ काही तास बसने प्रवास करून नेपियरमध्ये पोहोचला असून बीसीसीआयने हा सुंदर व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या टी-20 मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टनमध्ये आयोजित केला गेला होता, जो पावसामुळे रद्द करावा लागला. उभय संघांतील दुसरा सामना रविवारी (20 नोव्हेंबर) खेळला गेला, जो भारताने 65 धावांनी जिंकला. मालिकेतील तिसरा सामना खेळण्यासाठी संघ रमत-गमत नेपियरमध्ये पोहोचला. बीसीसीआयने अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केलेल्या व्हिडिओत न्यूझीलंडमधील सौदर्य चाहते पाहू शकतात.

न्यूझीलंड त्याच्या स्वच्छतेसाठी आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. व्हिडिओत देखील या गोष्ट स्पष्ट दिसतात. भारतीय संघाच्या बसमधील या व्हिडिओत सर्व खेळाडू दिसत आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सर्वात शेवटच्या सिटवर बसला आहे. त्याच्यासह शुबमन गिल देखील शेवटच्यात सिटवर दिसतो. या दौऱ्यात भारतीय संघाच्या कर्णधाराची भूमिका पार पाडणारा हार्दिक पंड्या मात्र पुढच्या सिटवर पसल्याचे पाहायला मिळते. न्यूझीलंडमधील रस्ते आणि निसर्गसंपदा पाहून संघातील खेळाडूही प्रभावित झाले आहेत. हार्दिक आणि सूर्यकुमारने या सौदर्याला दाद दिल्याचेही आपण व्हिडिओत पाहू शकतो.

📹📹 Of scenic routes, mountains and meadows and some fun along the way as #TeamIndia touchdown Napier ahead of the third and final T20I against New Zealand.#NZvIND pic.twitter.com/zobGI3V0ml

— BCCI (@BCCI) November 21, 2022

सध्या न्यूझीलंडमधील वातावर ढगाळ असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे पहिला सामना रद्द केला गेला होता, तर दुसरा सामना संपल्यानंतरही पावसाने मैदानात हजेरी लावली होती. अशात तिसऱ्या सामन्यात देखील पाऊश महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. मालिका बरोबरीवर सोडण्यासाठी तिसऱ्या सामन्यात विजयासाठी न्यूझीलंड पूर्ण प्रयत्न करेल. पावसामुळे जर सामना रद्द करावा लागला, तर मात्र भारताच्या नावावर होईल. (BCCI shared the video after the Indian team arrived in Napier.)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट की बाबर, विलियम्सनच्या मते कुणाचा कव्हर ड्राईव्ह सगळ्यात भारी? घ्या जाणून
VIDEO: चहल, सिराज आणि शार्दुलचा ‘सँडविच ब्रोमान्स’! ड्रेसिंग रुमचा व्हिडिओ व्हायरल   


Next Post
England-Cricket-Team

नव्या रंगात नव्या ढंगात होणार पुढील टी20 विश्वचषक! बदलणार सारी गणिते

Rishabh-Pant

पंतची जागा घेण्यासाठी सज्ज झाला 'हा' यष्टीरक्षक, सलग 5 शतकांचा पाऊस पाडत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा

tamilnadu cricket team

अरुणाचल प्रदेशची असामान्य कामगिरी! लिस्ट ए क्रिकेटमध्ये रचला जगात कुणालाच न जमलेला विक्रम

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143