Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सूर्याने विरोधी संघाच्या कर्णधारालाही पाडली भुरळ! सामना संपल्यानंतर विलियम्सन म्हणाला…

सूर्याने विरोधी संघाच्या कर्णधारालाही पाडली भुरळ! सामना संपल्यानंतर विलियम्सन म्हणाला...

November 20, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
kane williamson

Photo Courtesy: Twitter/cricketcomau


न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द केला गेला. उभय संघांतील दुसरा सामना रविवारी (20 नोव्हेंबर) खेळला गेला. भारतीय संघाने सुरुवातील जबरदस्त फलंदाजी आणि नंतर भेदक गोलंदाजी करत हा सामना 65 धावांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादव याने भारतासाठी नाबाद 111 धावा कुटल्या. विजयात सूर्यकुमारचे योगदान सर्वात मोहत्वाचे होते, जे स्वतः न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यानेही मान्य केले.

सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. 20 षटकांच्या या सामन्यात भारताने 6 विकेट्सच्या नुकसानावर 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूजीलंड 18.5 षटकांमध्ये अवघ्या 126 धावा करून सर्वबाद झाला. केन विलियम्सन (Kane Williamson) सामना संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “आम्ही या सामन्यात ज्या पद्धतीने प्रदर्शन केले, ते सर्वश्रेष्ठ नक्कीच नव्हते. पण सूर्यकुमारने जी खेळी केली, ती खूपच अप्रतिम होती. सूर्यकुमार यादवची खेली मी पाहिलेली सर्वात चांगली खेळी होती. काही शॉट्स त्याने असे खेळले, जे याआधी कधीच पाहिले नव्हते. भारतीय संघ आज खूपच चांगला खेळला, आमचा संघ मात्र असे प्रदर्शन करू शकला नाही.”

“गोलंदाजी करताना आम्हाला ती लय मिळाली नाही आणि विकेट देखील मिळू शकली नाही. फलंदाजी करतानाही जशी लय पाहिजे असते, ती आमचा संघ मिळवू शकला नाही. मी पुन्हा म्हणेल सूर्यकुमार यादवने जी खेळी केली, त्यामुळे या सामन्यात विजय आणि पराभवातील अंतर तयार झाले. आम्ही लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलो तेव्हा चेंडू थोडा स्विंग होत असल्याचे दिसत होते. भारतीय गोलंदाजांनी याचाच फायदा उचलला. या सामन्यात आम्ही जिथे कमी पडलो तिथे लक्ष्य देण्याची गरज आहे. सूर्यकुमार जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. कधी-कधी अश्या उत्कृष्ट खेळी पाहायला मिळत असतात,” असेही केन विलियम्सन पुढे बोलताना म्हणाला.

दरम्यान, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचे या सामन्यातील प्रदर्शन पाहिले अवघ्या 32 चेंडूत 50 धावा केल्या. तर शतक करण्यासाठी त्याने 49 चेंडू खेळले.  सामन्यात सूर्याने एकूण 51 चेंडू खेळले आणि 111 धावा करून नाबाद राहिला. सूर्यकुमारव्यतिरिक्त दीपक हुड्डा (Deepak Hooda) देखील मॅच विनर ठरला. हुड्डाने टाकलेल्या 2.5 षटकांमध्ये 10 धावा करून 4 विकेट्स घेतल्या. (Kane Williamson also became a fan of Suryakumar Yadav’s batting)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिगुल वाजले! फुटबॉल विश्वचषकाला कतारमध्ये धमाकेदार सुरुवात; आंतरराष्ट्रीय ताऱ्यांनी‌ गाजवला उद्घाटन सोहळा
ना बोल्ड, ना रनआऊट, ना कॅच आऊट; तरीही कसा बाद झाला श्रेयस अय्यर, पाहा व्हिडिओ 


Next Post
mohammad rizwan suryakumar yadav

सूर्यकुमार बनू शकतो सर्वाधिक टी-20 धावा करणारा फलंदाज, पण करावी लागणार ख्रिस गेलसारखी खेळी

Alex hales

ऍलेक्स हेल्सने सांगितले टी20मध्ये यशस्वी होण्याची रहस्य, भारताचे खेळाडू करु शकतील का 'या' गोष्टी?

Tim Southee praised suryakumar yadav

'या' गोष्टीमुळे आम्ही हारलो, साउदीने पराभवाची कारणे देत केले सूर्यकुमारवर वक्तव्य

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143