इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा ९ एप्रिल पासून सुरु होणार आहे. गतवर्षी कोरोना असल्यामुळे आयपीएलचे १३ वे हंगाम युएईमध्ये रंगले होते. परंतु, यंदा ही स्पर्धा भारतातच होणार आहे. असे म्हटले जाते की, या स्पर्धेत खेळणारे खेळाडू रातोरात कोट्यधीश होतात. या स्पर्धेत खेळाडूची आणि बीसीसीआयची किती कमाई होते, हे ऐकुन तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. चला तर मग जाणून घेऊ.
आयपीएल जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग मानली जाते. या स्पर्धेत जगभरातील खेळाडू आपले नशीब आजमावून पाहतात. तसेच अनेक युवा खेळाडूंवर कोटी रुपयांची बोली लावली जाते. गतवर्षी कोरोना असल्यामुळे आयपीएल २०२० स्पर्धा उशिराने युएईमध्ये खेळवण्यात आली होती. तरीदेखील या स्पर्धेत बीसीसीआयला प्रचंड फायदा झाला होता. बीसीसीआयने आयपीएल २०२० स्पर्धेत तब्बल ४००० कोटींची कमाई केली होती. तसेच टीव्हीवर आयपीएल पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत देखील २५ टक्के वाढ झाली होती.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने २००८ मध्ये विराट कोहलीला १२ लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. तेव्हापासून तो याच संघातून खेळत आहे. त्याला आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून प्रत्येक हंगामात तब्बल १७ कोटींचे मानधन दिले जाते. यासोबतच तो जाहिरात करतो, त्यातून त्याची वेगळी कमाई होती. आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे.
तसेच भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई संघाचा कर्णधार एमएस धोनी हा आयपीएलच्या पहिल्या हंगांमापासून याच संघासोबत आहे. त्याला २००८ मध्ये झालेल्या लिलावत चेन्नई संघाने ६ कोटी खर्च करत आपल्या संघात स्थान दिले होते. तसेच ३ वेळेस चेन्नई संघाला जेतेपद मिळवून देणाऱ्या धोनीला, चेन्नई संघ प्रत्येक हंगामात १५ कोटी इतके मानधन देते. तसेच तो जहिरातीतून प्रचंड कमाई करतो.
मुंबई इंडियन्स संघाला ५ वेळेस जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माने आयपीएलचे सुरुवातीचे ३ हंगाम डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळले होते. त्यांनी रोहित शर्माला ३ कोटी रुपये खर्च करत आपल्या संघात समाविष्ट केले होते. त्यानंतर २०११ मध्ये त्याला मुंबई इंडियन्स संघाने आपल्या संघात स्थान दिले होते.
आता त्याला मुंबई संघाकडून तब्बल १५ कोटी इतके मानधन दिले जात आहे. तसेच याच संघाकडून खेळणाऱ्या हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्स संघाने २०१५ मध्ये झालेल्या लिलावात १० लाख रुपये खर्च करत संघात स्थान दिले होते. त्याला आता मुंबई संघाकडून ११ कोटी इतके मानधन दिले जाते.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! आता दुकानांमध्ये विकेले जाणार धोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ प्रेरित चॉकलेट
सचिन तेंडुलकर आणि पृथ्वी शॉ यांच्यामध्ये आहे ‘हे’ मोठे साम्य, रिकी पाँटिंगने केला दावा
‘या’ कारणामुळे चाहत्याने उडवली खिल्ली उडवल्यानंतर गिलने दिले चोख प्रत्युत्तर; पाहा काय म्हणाला