ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यात दुसरा अनधिकृत कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या डावा दरम्यान अंपायरच्या एका निर्णयानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. चेंडू बॅटला लागला असूनही अंपायरनं फलंदाजाला बाद दिलं नाही, ज्यावरून गोंधळ उडाला.
झालं असं की, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्कस हॅरिस 48 धावांवर फलंदाजी करत असताना त्यानं ऑफस्पिनर तनुष कोटियनच्या चेंडूचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडूनं बॅटची कड घेतली आणि पहिल्या स्लिपकडे गेला. यावर क्षेत्ररक्षकानं सोपा झेल घेतला. यानंतर भारतीय खेळाडूंनी उत्साहात अपील केली, परंतु अंपायरवर याचा काहीही परिणाम झाला नाही. कोटियननं अंपायरला सांगण्याचा प्रयत्न केला की चेंडू बॅटची कड चाटून स्लिपच्या दिशेनं गेला आहे, परंतु अंपायरनं फलंदाजाला बाद दिलं नाही.
View this post on Instagram
अंपायरच्या या निर्णयामुळे भारतीय खेळाडूंसह समालोचकही संतापले. चेंडू बॅटला नाही तर पॅडला लागला असा अंपायरचा विश्वास होता. मात्र रिव्ह्यू नसल्यामुळे टीम इंडिया डीआरएस घेऊ शकली नाही. हॅरिसनं या जीवदानाचा फायदा घेत आणखी 26 धावा जोडल्या. तो 74 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 223 धावा करण्यात यश आलं. उल्लेखनीय म्हणजे, पहिल्या सामन्यात मैदानावरील पंचांनी भारतीय खेळाडूंवर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला होता. त्यामुळे इशान किशन पंचांशी वाद घालताना दिसला होता.
पहिली कसोटी जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ दुसरी कसोटीही जिंकण्याच्या मार्गावर आहे. टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 161 धावांत आटोपली. त्याचवेळी मेन इन ब्लूचा फ्लॉप शो दुसऱ्या डावातही कायम आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतानं 5 विकेट गमावून 73 धावा केल्या होत्या. सध्या ध्रुव जुरेल (19) आणि नितीश रेड्डी (9) क्रीजवर आहेत.
हेही वाचा –
गुड न्यूज! स्टार भारतीय फलंदाजाच्या घरी लवकरच पाळणा हलणार, बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी आनंदाची बातमी
बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी भारताची सर्वात मजबूत प्लेइंग 11, या खेळाडूंना मिळू शकते संधी
मोहम्मद रिझवानचं नाव क्रिकेटच्या इतिहासात अजरामर! अशी कामगिरी करणारा केवळ दुसराच पाकिस्तानी